Jejuri | सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरीगडावर खंडेरायाची यात्रा

Jejuri | सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरीगडावर खंडेरायाची यात्रा

| Updated on: May 30, 2022 | 12:03 PM

खंडेरायाची जेजुरी आज अशी पिवळीधमक झाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी भंडाऱ्याची उधळण केली.

महाराष्ट्राचे श्रध्दास्थान आणि कुलदैवत म्हणून प्रसिध्द असलेल्या जेजुरीच्या (Jejuri) खंडोबा (khandoba) देवाच्या सोमवती (Somvati Amavasya) अमावस्येनिमित्तानं यात्रा सुरु झाली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांनी जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी जेजुरीत गर्दी केली आहे. सोमवारी अमावस्या येतं असल्यामुळे ही अमावस्या ‘सोमवती अमावस्या’ म्हणून ओळखली जाते.खंडेरायाची जेजुरी आज अशी पिवळीधमक झाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी भंडाऱ्याची उधळण केली. पालखी सोहळ्यात भाविकांनी पिवळ्याधमक भंडाऱ्यायाची मुक्त उधळण केली. त्यामुळे जेजुरीला सोन्याचं रुप आलंय.खंडेरायाच्या वर्षभर विविध यात्रा भरत असतात, त्यातीलच एक महत्त्वाची म्हणजे ही सोमवती अमावस्या. या यात्रेमुळे दोन दिवसांपासूनच भाविकांची जेजुरीत गर्दी केली आहे.

Published on: May 30, 2022 12:03 PM