Jyeshtha Purnima 2022: ज्येष्ठ पौर्णिमेला करा ‘हा’ छोटासा उपाय; घरात येईल सुख समृद्धी
या वर्षी ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा 14 जून 2022 ला येत आहे, तो दिवस मंगळवार आहे. ज्येष्ठ पौर्णिमा (Jyeshtha Purnima 2022) व्रत हे ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला पाळले जाते. हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्त्व असते. सुख-समृद्धी लाभण्यासाठी , ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी व्रत आणि पूजा करतात. हा दिवस भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेला समर्पित आहे. […]
या वर्षी ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा 14 जून 2022 ला येत आहे, तो दिवस मंगळवार आहे. ज्येष्ठ पौर्णिमा (Jyeshtha Purnima 2022) व्रत हे ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला पाळले जाते. हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्त्व असते. सुख-समृद्धी लाभण्यासाठी , ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी व्रत आणि पूजा करतात. हा दिवस भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेला समर्पित आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान, उपवास आणि दान-धर्म केल्याने शुभ फळ मिळते. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी, वट पौर्णिमा (vat purnima 2022) व्रत देखील असते. पतीच्या दीर्घायुष्यासाठी विवाहित स्त्रिया या दिवशी व्रत ठेवतात. वडाच्या झाडाची पूजा करतात. याशिवाय चांगला वर मिळावा म्हणूण विवाह योग्य तरुणीसुद्धा व्रत ठेऊन वडाच्या झाडाची पूजा करतात. या दिवशी पूजेसोबत काही उपाय केल्यास विशेष लाभ होतो.
ज्येष्ठ पौर्णिमा व्रत 2022 मुहूर्त
पौर्णिमा तारीख प्रारंभ: 13 जून, सोमवार, 09.02. पौर्णिमा शेवटची तारीख: 14 जून, मंगळवार, संध्याकाळी 05.21 वाजता
लक्ष्मीची पूजा
ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीच्या मूर्तीला 11 कौड्या अर्पण करा आणि तिला हळदीचा टिळा लावा. दुसऱ्या दिवशी या कौड्या लाल कपड्यात बांधा आणि जिथे पैसे ठेवता तिथे ठेवा. असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही अशी मान्यता आहे.
स्नान आणि दान
ज्येष्ठ पौर्णिमेला स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. या दिवशी स्नान आणि पूजा केल्यानंतर गरजूंना दान करावे.
ज्येष्ठ पौर्णिमेला या वस्तूंचे दान करा
ज्येष्ठ पौर्णिमेला स्नान केल्यानंतर चंद्राशी संबंधित वस्तूंचे दान करावे. या दिवशी तुम्ही पांढरे वस्त्र, साखर, तांदूळ, दही, चांदी, पांढरी फुले, मोती इत्यादी ब्राह्मणाला दान करू शकता. यामुळे चंद्र बलवान होतो, जीवनात सुख-समृद्धी येते.
पिंपळाच्या झाडाची पूजा
शास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीचे पीपळाच्या झाडावर वास्तव्य असते. अशा स्थितीत या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर पिंपळाच्या झाडावर एखादा गोड पदार्थ अर्पण करून जल अर्पण करावे. यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)