सनातन धर्मात म्हणजेच हिंदू धर्मात मानसाने पाहिलेल्या स्वप्नांना विशेष महत्त्व सांगितले आहे. शास्त्रानुसार, स्वप्नात (In a dream) जे दिसते त्याचे वाईट किंवा चांगले परिणाम संबधित व्यक्तीवर होतात. असे म्हणतात की, जर काही गोष्टी स्वप्नात दिसल्या तर जीवनात सुख-शांती सोबतच चालू असलेल्या पैशाची कमतरता देखील दूर होते. संपत्तीचा लाभ (Wealth gain) माता लक्ष्मीशी संबंधित आहे. हिंदू धर्मात देवी लक्ष्मीच्या आठ रूपांचे विश्लेषण केले गेले आहे, त्यापैकी तिचे एक रूप म्हणजे, लक्ष्मी, संपत्तीची देवी मानली जाते. जर एखाद्यावर माता लक्ष्मीची कृपा असेल तर तिला आयुष्यात कधीही पैशाशी संबंधित समस्या (Problems with money) उद्भवू शकत नाहीत किंवा माता लक्ष्मी एखाद्यावर कोपली तर त्या व्यक्तीच्या जीवनात कलह आणि गरिबी येऊ शकते. घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होण्याला लोक धनप्राप्ती असेही म्हणतात.
अनेक संकेत जीवनात किंवा घरात संपत्तीच्या देवीच्या आगमनाशी संबंधित आहेत. असे संकेत दिसल्यावर, असे म्हटले जाऊ शकते की लवकरच पैसे मिळू शकतात. त्याचप्रमाणे स्वप्नात काही गोष्टी पाहणे देखील धनप्राप्तीचे लक्षण आहे. या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही लक्षणांबद्दल सांगणार आहोत.