Kabirdas Jayanti 2022: आज आहे कबीरदास जयंती; कबीरांचे ‘हे’ विचार बदलवून टाकेल तुमचे आयुष्य

संत कबीरदास यांची जयंती (Kabirdas Jayanti 2022) दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. या वर्षी संत कबीर जयंती (Sant Kabir jayanti)  14 जून 2022 रोजी साजरी होणार आहे. संत कबीरदासांच्या जन्माविषयी अचूकपणे सांगणे शक्य नाही, पण काही पुराव्यांनुसार कबीर दासजींचा जन्म काशी येथे 1398 मध्ये झाला होता. संत कबीरदास हे हिंदी साहित्यातील असे एक […]

Kabirdas Jayanti 2022: आज आहे कबीरदास जयंती; कबीरांचे 'हे' विचार बदलवून टाकेल तुमचे आयुष्य
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 11:53 AM

संत कबीरदास यांची जयंती (Kabirdas Jayanti 2022) दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. या वर्षी संत कबीर जयंती (Sant Kabir jayanti)  14 जून 2022 रोजी साजरी होणार आहे. संत कबीरदासांच्या जन्माविषयी अचूकपणे सांगणे शक्य नाही, पण काही पुराव्यांनुसार कबीर दासजींचा जन्म काशी येथे 1398 मध्ये झाला होता. संत कबीरदास हे हिंदी साहित्यातील असे एक कवी होते, ज्यांनी आपल्या लेखणीतून समाजात पसरलेल्या ढोंगीपणाला फटकारले होते. संत कबीर यांनी आयुष्यभर समाजात पसरलेल्या कुप्रथांचा आणि अंधश्रद्धांचा निषेध केला. संत कबीर केवळ संतच नव्हते तर ते विचारवंत आणि समाजसुधारकही होते. जीवन जगण्याचे अनेक धडे त्यांनी आपल्या दोह्यांमधून दिले आहेत. त्यांचे दोहे अतिशय सोप्या भाषेत होते, त्यामुळे ते दोहे कोणालाही सहज समजू शकतात. आजही लोक त्यांचे दोहे गुणगुणतात. कबीर जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.

कबीर दास यांच्या जन्माबाबत अनेक मतभेद आहेत. काही तथ्यांच्या आधारे असे मानले जाते की रामानंद गुरूंच्या आशीर्वादाने त्यांचा जन्म एका विधवा ब्राह्मणीच्या पोटी झाला आणि लोकलज्जेच्या भीतीने त्यांनी कबीरदासांना काशीसमोरील लहरतारा नावाच्या तलावाजवळ सोडले. ते लेई आणि लोइमा नावाच्या विणकराने वाढवले ​​होते असे म्हणतात. त्याचवेळी काही विद्वानांचे असे मत आहे की, कबीरदास जन्माने मुस्लिम होते आणि त्यांना रामनामाचे ज्ञान गुरु रामानंद यांच्याकडून मिळाले होते.

संत कबीर यांनी आपल्या दोह्यांमधून लोकांच्या मनात असलेले गैरसमज दूर केले आणि धर्माच्या कट्टरवादावर जोरदार हल्ला केला. समाज सुधारण्यासाठी त्यांनी अनेक दोहे रचले. म्हणूनच त्यांना समाजसुधारक म्हटले गेले आहे.

हे सुद्धा वाचा

त्यावेळी समाजात अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा पसरल्या होत्या. काशीमध्ये मरणाऱ्याला स्वर्ग तर मगहरमध्ये नरक भोगावा लागतो, अशी अंधश्रद्धाही होती. लोकांमध्ये पसरलेली ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी, संत कबीर आयुष्यभर काशीमध्ये राहिले, परंतु शेवटी ते मगहरला निघून गेले आणि मगहरमध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

संत कबीर यांचे निवडक दोहे आणि त्याचे अर्थ- (sant Kabir dohe meaning)

गुरु गुरु मे  भेद है, गुरु गुरु मे भाव

सोई  गुरु नीत बंदिये , शब्द बतावे दाव
अर्थ- या दोह्यांमध्ये संत कबीर आपल्याला खरा गुरु कसा ओळखावा याबद्दल मार्गर्दर्शन करतात. संत कबीर म्हणतात कि जगात अनेक गुरु आढळतात. आणि त्या सर्वांमध्ये फरक आहे. अश्यावेळी खरे गुरु कोणते हे कसे ओळखायचे ? तर जे गुरु शब्दांमागचे खरे ज्ञान देतात. फक्त पुस्तकी पोपटपंची न शिकवता आपल्याला  त्या शब्दांमध्ये लपलेले अनुभवात्मक ज्ञान देतात तेच खरे गुरु होत. आणि अश्याच गुरूच्या चरणी आपण निष्ठा वाहायला हवी.
बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड  खजूर
पंथी को छाया नाही, फल लगे अति दूर
अर्थ- खजुराचे झाड खूप उंचच उंच वाढते.  या झाडाने पुरेशी सावली तयार होत नाही. सोबतच याला लागणारे फळ हे खूप दूर असते त्यामुळे ते सहजासहजी कोणाला मिळत नाही. गरजू माणसाला तर नक्कीच नाही.कबीर म्हणतात की मानसाने खजुराच्या झाडाप्रमाणे नसावे. आपण खूप मोठे झालात, अमाप संपत्ती मिळवली. मान – मरातब, सत्ता मिळवली. पण जर या सगळ्यांचा वापर आपण इतरांच्या भल्यासाठी करत नसाल, गरजूंच्या मदतीसाठी करत नसाल तर तुमचे ज्ञान, पद  आणि मोठेपणा सगळं काही व्यर्थ आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...