Kajari Teej 2022: कधी साजरी होणार कजरी तिज? मुहूर्त आणि महत्त्व
कजरी तीजच्या दिवशी महिलांनी निर्जल व्रत पाळावे आणि सोळा श्रृंगार करून भगवान शंकराला जल अर्पण करावे. यासोबतच देवी पार्वतीला लाल चुनरी अर्पण करा. या दिवशी अभिजीत, विजय आणि सर्वार्थ सिद्धी योगातील काजरी तीजचे व्रत अतिशय शुभ राहील.
Kajari Teej 2022 Date & Shubh Yog: कजरी तीज भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरी केली जाते. काजरी तीज रक्षाबंधनाच्या तीन दिवसांनी आणि कृष्ण जन्माष्टमीच्या पाच दिवस आधी साजरी केली जाते. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. सवाष्ण स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कजरी तीजचे व्रत करतात. या दिवशी स्त्रिया सोळा श्रृंगार करतात आणि दिवसभर निर्जल उपवास करतात. कजरी तीज हा हिंदू धर्मात साजरा केला जाणारा विशेष सण आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि बिहारमध्ये कजरी तीजचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
कजरी तिज मुहूर्त
यंदा कजरी तीज रविवार, 14 ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे. तृतीया तिथी 14 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 12.53 वाजता सुरू होईल आणि 14 ऑगस्ट रोजी रात्री 10.35 वाजता समाप्त होईल. यंदा महिलांना पुजा करण्यासाठी भरपूर वेळ मिळेल.
कजरी तीजच्या दिवशी करा हे उपाय
नोकरीचे उपाय- जर तुमच्या जोडीदाराला नोकरी मिळत नसेल निंवा नोकरीमध्ये समस्या असतील तर कजरी तीजच्या दिवशी संध्याकाळी शनि मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. यामुळे आर्थिक आणि मानसिक समस्या दूर होतील. नोकरीत मान-सम्मान मिळेल तसेच खोट्या आरोपातून सुटका होईल.
घरामध्ये सुख समृद्धीसाठी- जर तुमच्या घरात पैशांची चणचण असेल व आर्थिक घडी विस्कटलेली असेल तर काजरी तीजच्या दिवशी एखाद्या गरीबाला दान करा. यामुळे तुमच्या घरात येणारी संपत्ती आणि सुख-समृद्धी वाढेल. हिंदू धर्मात दानाचे विशेष महत्त्व आहे. आपण जे दान करतो ते अधिक पटीने आपल्याला प्राप्त होते अशी मान्यता आहे. दान हे यथाशक्ती आणि आनंदाने करावे. घरात शंख वाजवावा. शंखनाद केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. घराला दृष्ट लागली असल्यास निघून जाते. कजरी तिजच्या दिवशी किमान पाच वेळा घरात शंखनाद करावा.
वैवाहिक जीवनात आनंदासाठी – कजरी तीजच्या दिवशी महिलांनी निर्जल व्रत पाळावे आणि सोळा श्रृंगार करून भगवान शंकराला जल अर्पण करावे. यासोबतच देवी पार्वतीला लाल चुनरी अर्पण करा. या दिवशी अभिजीत, विजय आणि सर्वार्थ सिद्धी योगातील काजरी तीजचे व्रत अतिशय शुभ राहील. अभिजीत मुहूर्त दुपारी 12.08 ते 12.59 पर्यंत असेल. 15 ऑगस्ट रोजी रात्री 09:56 ते 06:09 पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग राहील आणि विजय मुहूर्त दुपारी 02:41 ते 03:33 पर्यंत राहील.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)