Kalashtami 2022: कालाष्टमी व्रत, जाणून घ्या मुहूर्त आणि पूजा विधी

उद्या कालाष्टमी आहे. यादिवशी भैरवाच्या काळ भैरव रूपाची पूजा केली जाते. पूजेचा विधी आणि मुहूर्त जाणून घेऊया.

Kalashtami 2022: कालाष्टमी व्रत, जाणून घ्या मुहूर्त आणि पूजा विधी
कालाष्टमी Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 16, 2022 | 10:53 PM

मुंबई, दर महिन्याला कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी व्रत  (Kalashtami) केले जाते. कालाष्टमी व्रतामध्ये भगवान शिवाच्या भैरव रूपाची पूजा केली जाते. धार्मिक ग्रंथानुसार भैरवाची तीन रूपे आहेत – काल भैरव, बटुक भैरव आणि रुरु भैरव. या दिवशी त्यांच्या कालभैरव रूपाची पूजा करण्याचा नियम आहे. असे मानले जाते की यामुळे जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात.

कालाष्टमी तारीख आणि वेळ

पंचांगानुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 09:29 पासून सुरू होईल आणि दुसर्‍या दिवशी, 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:57 वाजता समाप्त होईल. 17 ऑक्टोबर रोजी कालाष्टमी व्रत पाळण्यात येणार असून मंगळवारी 18 ऑक्टोबर रोजी पारण केले जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

कालाष्टमी मुहूर्त

  • कालाष्टमी व्रत 2022: सोमवार, 17 ऑक्टोबर
  • कार्तिक कृष्ण अष्टमी 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 09:29 वाजता सुरू होईल
  • कार्तिक कृष्ण अष्टमी 18 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11:57 वाजता संपेल
  • कालाष्टमी व्रत 2022 उपासना पद्धत

पूजेचा विधी

कार्तिक महिन्यातील अष्टमी तिथीला सकाळी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. त्यानंतर जवळच्या शिवमंदिरात जाऊन भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी. घरामध्ये कालाष्टमी व्रताची पूजा करायची असल्यास घरातील पूजेच्या ठिकाणी काळ्या वस्त्रावर पार्वती आणि गणेशाची मूर्ती बसवावी.

विधिवत पूजा करावी. पूजेच्या दिवशी कालभैरवाला पूजा साहित्य अर्पण करून दिवा लावावा. आता खालीलपैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करा. त्यानंतर आरती करावी. असे मानले जाते की याद्वारे सर्व भय दूर करणारे बाबा कालभैरवाचे आशीर्वाद प्राप्त होतात. घर संपत्तीने भरलेले असेल.

कालाष्टमी व्रत मंत्र

शिवपुराणानुसार कालाष्टमी व्रतामध्ये कालभैरवाच्या पूजेदरम्यान या मंत्रांचा जप करणे अत्यंत फलदायी मानले जाते.

मंत्र:

अतिक्रूर महाकाय कल्पान्त दहनोपम्, भैरव नमस्तुभ्यं अनुज्ञा दातुमर्हसि!!

इतर मंत्र:

ओम भयहारम् च भैरव:। ओम कालभैरवाय नमः । ओम ह्रीं बम बटुकाय आपदुद्धरणाय कुरुकुरु बटुकाय हर्यम्. ॐ भ्राम काळभैरवई फुट ।

भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....