Kalashtami 2023 : उद्या श्रावण महिन्यातली मासिक कालाष्टमी, मुहूर्त आणि पूजा विधी
कालाष्टमीच्या (Kalashtami) दिवशी कालभैरव देवाच्या उग्र रूपाची पूजा केली जाते. या दिवशी तंत्र मंत्र सिद्धी प्राप्त केलेले साधक निशा काळात कालभैरवाची पूजा करतात. कालभैरवाला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो.
मुंबई : दर महिन्याला कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी (Shrawan Kalashtami 2023) साजरी केली जाते. यावेळी श्रावणातली कालाष्टमी 6 सप्टेंबर रोजी साजरी होणार आहे. कालाष्टमी हा सण महादेवाला समर्पित आहे. कालाष्टमीच्या दिवशी कालभैरव देवाच्या उग्र रूपाची पूजा केली जाते. या दिवशी तंत्र मंत्र सिद्धी प्राप्त केलेले साधक निशा काळात कालभैरवाची पूजा करतात. कालभैरवाला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो. असे मानले जाते की कालाष्टमीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने सांसारिक दुःखांपासून मुक्ती मिळते. चला, जाणून घेऊया कालाष्टमीची शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धती. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाची अष्टमी तिथी दुपारी 03.37 पासून सुरू होईल, जी 7 सप्टेंबर रोजी दुपारी 04.14 वाजता समाप्त होईल. तर निशा काळात काल भैरव देवाची पूजा केली जाते. अशा प्रकारे 6 सप्टेंबर रोजी कालाष्टमी साजरी केली जाईल.
कालाष्टमी पूजेची पद्धत
कालभैरव देव, भगवान शिवाचे उग्र रूप, केवळ निशा काळातच पूजले जाते. या दिवशी सकाळी स्नान आणि ध्यान केल्यानंतरच पूजा करावी. ब्रह्मवेळेत उठून दैनंदिन कामातून निवृत्त झाल्यावर गंगाजलयुक्त पाण्याने स्नान करावे. स्वच्छ वस्त्र परिधान करून सर्वप्रथम सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. यानंतर षोडशोपचार करून कालभैरवाची पूजा करावी. यावेळी शिव चालीसा, शिवस्त्रोत आणि मंत्रांचे पठण करा. पूजेच्या शेवटी तुमची इच्छा कालभैरवाला सांगा. विशेष कार्य सिद्धीसाठीही उपवास करता येतो. यानंतर निशा काळात पुन्हा विधीपूर्वक भैरव देवाची पूजा करावी.
कालाष्टमीच्या दिवशी या चूका टाळा
- कालाष्टमीच्या दिवशी चुकूनही अहंकारी विचार मनात ठेवू नका, ज्येष्ठांचा अनादर करू नका, महिलांवर अत्याचार करू नका. अनैतिक कृत्य करणाऱ्यांना कालभैरवाच्या नाराजीला सामोरे जावे लागते.
- कालभैरवाची पूजा कोणाचेही नुकसान करण्याच्या चुकीच्या उद्देशाने करू नये. यामुळे भविष्यात त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात.
- कालाष्टमीच्या दिवशी दारूला हातही लावू नका. मांसाहारालाही मनाई आहे.
- गृहस्थांनी बाबा भैरवाची सात्विक पूजा करावी.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)