Kalashtami 2023 : उद्या मासिक कालाष्टमी, कालभैरवाच्या कृपेने पुर्ण होतील सर्व मनोकामना
कालाष्टमी हा हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा दिवस आहे. हा दिवस भगवान कालभैरवाच्या पूजेला समर्पित आहे. या शुभ दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान भैरवाचा आशीर्वाद घेतात. कालाष्टमी पौर्णिमेनंतर कृष्ण पक्षात येते.
मुंबई : हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी (Kalashtami July 2023) साजरी केली जाते. कालाष्टमीला भगवान शिवाचे उग्रस्वरूप असलेल्या कालभैरवाची पूजा करण्याची पद्धत आहे. भैरव म्हणजे भीतीचा पराभव करणारा आणि जगाचे रक्षण करणारा. काळभैरवाचा उपासक कधीही शत्रू, ग्रह, वाईट शक्ती, अकाली मृत्यू यांच्या भीतीने व्याकूळ होत नाही. जाणून घेऊया कालाष्टमीची तिथी, शुभ मुहूर्त आणि या दिवशी कालभैरवाच्या पूजेचे महत्त्व.
श्रावण कालाष्टमी 2023 तारीख
मासिक कालाष्टमी 9 जुलै 2023 रोजी रविवारी म्हणजेच उद्या आहे. कालभैरवाच्या भक्तांवर मृत्यूची सावलीही फिरत नाही, अशी धार्मिक श्रद्धा आहे. बाबा काल भैरव यांना काशीचा कोतवाल म्हणूनही ओळखले जाते. कालभैरवाच्या पूजेशिवाय भगवान काशी विश्वनाथाची पूजा अपूर्ण मानली जाते.
कालाष्टमी 2023 मुहूर्त
पंचांगानुसार, यंदा कृष्ण पक्षातील कालाष्टमी 09 जुलै 2023 रोजी संध्याकाळी 07.59 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 10 जुलै 2023 रोजी संध्याकाळी 06.43 वाजता समाप्त होईल.
कालाष्टमीला निशिता काळात तांत्रिक पूजा केली जाते, परंतु गृहस्थांनी या दिवशी प्रदोष कालात काल भैरव आणि महादेवाची पूजा करावी.
प्रदोष काल पूजेच्या वेळा – रात्री 07.22 – रात्री 9.54 (9 जुलै 2023) निशिता काल मुहूर्त – 12.06 am – 12.47 am (10 जुलै 2023)
कालाष्टमीची पूजा पद्धत
कालाष्टमीच्या दिवशी संध्याकाळी शिवलिंगाला दूध आणि दह्याने अभिषेक करा आणि 21 बेलपत्रावर लाल चंदनाने ओम लिहून शिवाला अर्पण करा. एकामागून एक बेलपत्र अर्पण करा आणि ‘ओम हं शं नन गण सन सन महाकाल भैरवाय नम:’ या मंत्राचा जप करत रहा. आता काल भैरवाष्टकचा जप करा. नंतर काळ्या कुत्र्याला गोड रोटी आणि गुळाची खीर खायला द्यावी, यामुळे कालभैरव खूप प्रसन्न होतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)