Kalashtami : आज मासिक कालाष्टमी, आजच्या दिवशी या चुका अवश्य टाळा

अष्टमी तिथी 9 जुलै रोजी म्हणजेच आज रात्री 07:59 वाजता सुरू होईल आणि ती संध्याकाळी 06:43 वाजता संपेल.

Kalashtami : आज मासिक कालाष्टमी, आजच्या दिवशी या चुका अवश्य टाळा
कालभैरवImage Credit source: Social media
Follow us
| Updated on: Jul 09, 2023 | 12:54 PM

मुंबई : कालाष्टमी हा सण हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो. कालाष्टमीचा (Kalashtami 2023) दिवस भगवान कालभैरवाला समर्पित आहे. या दिवशी भक्त कालभैरवाचे उपवास करून त्यांची पूजा करतात. प्रत्येक महिन्याची कालाष्टमी कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरी केली जाते. हिंदू कॅलेंडरनुसार, कालाष्टमी 9 जुलै 2023 रोजी म्हणजेच आज साजरी केली जात आहे. धार्मिक मान्यतेनुसार भगवान कालभैरव अष्टमीच्या दिवशी अवतरले होते. असे मानले जाते की या दिवशी पूजा केल्याने घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा संपते.

कालाष्टमी शुभ मुहूर्त

हिंदू कॅलेंडरनुसार, आषाढ महिन्यातील कालाष्टमी कृष्ण अष्टमीच्या दिवशी साजरी केली जाते. अष्टमी तिथी 9 जुलै रोजी म्हणजेच आज रात्री 07:59 वाजता सुरू होईल आणि ती संध्याकाळी 06:43 वाजता संपेल. यासोबतच आज सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होणार आहे, ज्याची वेळ पहाटे 05:30 ते रात्री 07:29 पर्यंत असेल.

कालाष्टमी व्रत पूजा पद्धत

या दिवशी भगवान शिवाच्या कालभैरव रूपाची पूजा केली जाते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून उपवासाचे व्रत करावे. यानंतर शिव किंवा भैरव मंदिरात जाऊन पूजा करावी. संध्याकाळी शिव-पार्वती आणि भैरवाची पूजा करा. कारण भैरवाला तांत्रिकांचे देवता मानले जाते, त्यामुळे त्याची रात्रीही पूजा केली जाते. कालभैरवाच्या पूजेमध्ये दिवा, काळे तीळ, उडीद आणि मोहरीचे तेल अवश्य समाविष्ट करा. व्रत पूर्ण केल्यानंतर काळ्या कुत्र्याला गोड पोळी खायला द्या.

हे सुद्धा वाचा

कालाष्टमी व्रताचे महत्त्व

काल-भैरव हे भगवान शिवाचे एक रूप आहे, म्हणून असे म्हणतात की जो कोणीही या दिवशी कालभैरवाची खऱ्या भक्तीभावाने पूजा करतो, भगवान शिव त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर करतात. त्याचा उद्धार होतो. आनंद आणि समृद्धी नांदते.

कालाष्टमीच्या दिवशी  या चुका टाळा

  1.  कालाष्टमीच्या दिवशी मद्य सेवन अजिबात करू नये. तसेच मांसाहारापासून दूर राहावे.
  2. या दिवशी उद्धटपणा दाखवू नका, ज्येष्ठांचा अनादर करू नका आणि महिलांना सन्मानपूर्वक वागणूक द्या.
  3. या दिवशी तीक्ष्ण वस्तू वापरणे टाळावे.
  4. या दिवशी कोणत्याही प्राण्याला त्रास देऊ नये. असे केल्याने काल भैरव क्रोधित होतात.
  5. तुमच्या पालकांचा आणि शिक्षकांचा अपमान करू नका.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.