Kalashtami : आज मासीक कालाष्टमी, अशा प्रकारे करा काल भैरवाची पुजा

धार्मिक मान्यतेनुसार भगवान कालभैरव (Kalbhairava) अष्टमीच्या दिवशी प्रकट झाले. असे मानले जाते की या दिवशी पूजा केल्याने घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा संपते.

Kalashtami : आज मासीक कालाष्टमी, अशा प्रकारे करा काल भैरवाची पुजा
काल भैरवImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 10, 2023 | 10:11 AM

मुंबई : दर महिन्याला कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी साजरी केली जाते. कालाष्टमीच्या (Kalashtami) दिवशी काल भैरवाची पूजा केली जाते. या दिवशी अनेक जण उपवास देखील करतात. धार्मिक मान्यतेनुसार भगवान कालभैरव (Kalbhairava) अष्टमीच्या दिवशी प्रकट झाले. असे मानले जाते की या दिवशी पूजा केल्याने घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा संपते. यावेळी 10 जून 2023 रोजी म्हणजेच आज कालाष्टमी साजरी केली जात आहे. अशा वेळी कालाष्टमी व्रताचे शुभ मुहूर्त, उपासना पद्धत आणि महत्त्व जाणून घेऊया.

कालाष्टमी व्रताची पूजा करण्यासाठी शुभ वेळ

  • ज्येष्ठ, कृष्ण अष्टमी
  • सुरुवात – 10 जून, दुपारी 2:06 वाजता सुरू होईल
  • संपेल – 11 जून, दुपारी 12:05 वाजता संपेल

कालाष्टमी व्रताचे महत्त्व

काल-भैरव हे भगवान शिवाचे एक रूप आहे, म्हणून असे म्हणतात की जो कोणीही या दिवशी कालभैरवाची खरी भक्ती आणि भक्तीभावाने पूजा करतो, भगवान शिव त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर करतात आणि त्याचे जीवन सुखकर बनवतात.

कालाष्टमी पूजा विधी

या दिवशी भगवान शिवाच्या कालभैरव रूपाची पूजा केली जाते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून उपवासाचा संकल्प करावा. यानंतर शिव किंवा भैरव मंदिरात जाऊन पूजा करावी. संध्याकाळी शिव पार्वती आणि भैरवजींची पूजा करा. भैरवाला तांत्रिकांचे देवता मानले जाते, त्यामुळे त्यांची रात्रीही पूजा केली जाते. कालभैरवाच्या पूजेमध्ये दिवा,काळे तीळ,उडीद आणि मोहरीचे तेल अवश्य समाविष्ट करा. व्रत पूर्ण केल्यानंतर काळ्या कुत्र्याला गोड पोळी खायला द्या.

हे सुद्धा वाचा
  • कालाष्टमीच्या दिवशी चुकूनही हे काम करू नका
  • कालाष्टमीच्या दिवशी दारूचे सेवन अजिबात करू नये. तसेच मांसाहारापासून दूर राहावे.
  • या दिवशी उद्धटपणा दाखवू नका, ज्येष्ठांचा अनादर करू नका आणि महिलांचा अपमान करू नका.
  • या दिवशी तीक्ष्ण वस्तू वापरणे टाळावे.
  • या दिवशी कोणत्याही प्राण्याला त्रास देऊ नये. असे केल्याने काल भैरव क्रोधित होतात.
  • तुमच्या पालकांचा आणि शिक्षकांचा अपमान करू नका.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.