Kamika Ekadashi 2023 : आज कामिका एकादशी, भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करण्यासाठी या गोष्टींचे करा दान

या दिवशी जगत्पती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते. हे व्रत आज 13 जुलैला आहे. एकादशी व्रताला सनातन धर्मात विशेष महत्त्व देण्यात आले आहे.

Kamika Ekadashi 2023 : आज कामिका एकादशी, भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करण्यासाठी या गोष्टींचे करा दान
एकादशीImage Credit source: Social media
Follow us
| Updated on: Jul 13, 2023 | 10:29 AM

मुंबई : सनातन धर्मात प्रत्येक सण, उत्सव हे नियम व परंपरेनुसार साजरे केले जातात. वर्षभरात अनेक एकादशीचे व्रत केले जातात. त्यापैकी एक म्हणजे कामिका एकादशी (Kamika Ekadashi 2023). हिंदू कॅलेंडरनुसार, कामिका एकादशी व्रत दरवर्षी आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला पाळले जाते. या दिवशी जगत्पती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते. हे व्रत आज 13 जुलैला आहे. एकादशी व्रताला सनातन धर्मात विशेष महत्त्व देण्यात आले आहे. एवढेच नाही तर उपवासासह या दिवशी दानधर्म करण्याचाही नियम आहे. एकादशीच्या दिवशी दान केल्यास धार्मिक मान्यतेनुसार श्री हरी विष्णूची कृपा प्राप्त होते. आयुष्यातील सर्व दु:ख, संकटे दूर होतात. चला तर मग जाणून घेऊया कामिका एकादशीच्या दिवशी कोणत्या वस्तूंचे दान करावे.

फार महत्वाचे आहे एकादशीचे व्रत

एकादशीचा उपवास हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो. एकादशीची तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे आणि या दिवशी नियमानुसार जगत्पती विष्णूची पूजा केली जाते. भगवान विष्णूंसह तुळशीची पूजा करण्याचेही महत्त्व सांगण्यात आलेले आहे.

कामिका एकादशीला दान करा

जर तुम्हाला कामिका एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला प्रसन्न करायचे असेल तर सर्वप्रथम तुम्ही गरीब, असहाय्य आणि गरजूंना तांदूळ, मका, गहू इ. दान करा. कामिका एकादशीच्या दिवशी एखाद्या गरीब असहाय व्यक्तीला पिवळे कपडे दान केल्यास पत्रिकेतील बृहस्पति बलवान होतो.

हे सुद्धा वाचा

कामिका एकादशीला विशेष महत्त्व आहे  कारण या काळात भगवान विष्णू योग निद्रेत असतात आणि या काळात विधीवत पूजा अर्चा केल्याने  सर्व मनोकामना पूर्ण होतात.

या दिवशी वाटसरूंना जलदान करावे, गरीब असहाय्य लोकांना अन्नदान करावे. शक्य असल्यास आर्थिक मदतही करावी.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.