Kartiki Ekadashi 2023 : उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार विठ्ठलाची शासकीय महापूजा
Devendra fadnavis in Pandharpur उद्या कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीय यांच्या हस्ते पार पडणार आहे. यासाठी मध्यरात्रीनंतर 2 वाजून 20 मिनीटांनी उपमुख्यमंत्री मंदिरात येतील. श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा पहाटे 2:20 मिनिटांपासून ते 03:45 मिनिटांपर्यंत चालणार आहे. उपमुख्यमंत्र्यांसोबतच वारकऱ्यांपैकी एका जोडप्याला पुजेचा मान देण्यात येतो. यांच्या हस्ते विठ्ठलाची षोडशोपचार पूजा करण्यात येते.
पंढरपूर : उद्या कार्तिकी एकादशी आहे. या निमीत्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात शासकीय महापूजा होणार आहे. आषाढी एकादशीची महापूजा ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि कार्तिकी एकादशीची महापूजा ही राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडत असते. मंदिर समितीकडून हा मान त्यांना देण्यात येत आसतो. सध्या राज्याला दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे चर्चा करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना आमंत्रीत करण्यात आले आहे. मंदिर प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाकडून यानिमीत्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोणातून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे.
अशी होणार महापूजा
उद्या कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीय यांच्या हस्ते पार पडणार आहे. यासाठी मध्यरात्रीनंतर 2 वाजून 20 मिनीटांनी उपमुख्यमंत्री मंदिरात येतील. श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा पहाटे 2:20 मिनिटांपासून ते 03:45 मिनिटांपर्यंत चालणार आहे. उपमुख्यमंत्र्यांसोबतच वारकऱ्यांपैकी एका जोडप्याला पुजेचा मान देण्यात येतो. यांच्या हस्ते विठ्ठलाची षोडशोपचार पूजा करण्यात येते.
पूजेनंतर होणार विकास कामांचे भूमीपूजन
पूजेनंतर विठ्ठल मंदिराच्या 73 कोटी रुपयांच्या विकास कामापैकी पहिल्या टप्प्यातील 26 कोटीच्या कामाचं भूमिपूजन हे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. याशीवाय विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आहे आहे. मंदिर समितीचे सहा अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी माहिती आहे.
वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी होणार
कार्तिकी एकादशी निमीत्त पंढरपूरात दाखल होणाऱ्या भाविकांचा प्रशासनातर्फे मोफत आरोग्य तपासणी होणार आहे. तीन दिवस कार्तिकी वारीच्या निमित्ताने येणाऱ्या वारकऱ्यांची महाआरोग्य शिबिरात सर्वरोग निदान तपासणी करण्यात येणार आहे. एकाच ठिकाणी औषधोपचार आणि विविध तपासण्या करून गरज असल्यास पुढील शस्त्रक्रियेची सोयसुद्धा मोफत केली जाणार आहे. महाआरोग्य शिबिरासाठी पंढरपूरच्या 65 एकर क्षेत्रात आरोग्य मंडप उभारण्यात आला आहे. या शिबिरासाठी जवळपास 2 हजार डॉक्टरांच्या आणि 5 हजार स्वयंसेवक शिवसैनिकांच्या मदतीने 11 लाख रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. सोनोग्राफी एक्सरे, हृदयरोग तपासणी, शुगर तपासणी आदी तपासणी मोफत केली जाणार आहे.