Kawad Yatra 2023 : आजपासून सुरू होत आहे कावड यात्रा, काय आहे या यात्रेचे महत्त्व?
यंदा 5 जुलै रोजी म्हणजेच आजपासून कावड यात्रा (Kawad Yatra 2023) सुरू झाली आहे. यादरम्यान भाविक गंगा नदीतून पाणी भरतात आणि शिवमंदिरात शिवलिंगाला अर्पण करतात.
मुंबई : हिंदी भाषिकांचा श्रावण महिना (Shrawan 2023) 4 जुलै मंगळवारपासून सुरू झाला आहे आणि 31 ऑगस्ट रोजी संपेल. तर महाराष्ट्रात 18 जुलैपासून श्रावणाला सुरूवात होईल. भगवान शंकराच्या उपासनेसाठी श्रावण महिना अतिशय प्रिय मानला जातो. या वेळी श्रावणात 8 सोमवार पडत आहेत. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी बेलपत्रासह भगवान भोलेनाथाची विशेष पूजा केली जाते. भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी त्यांचे भक्तही या महिन्यात कावड घ्यायला जातात. यंदा 5 जुलै रोजी म्हणजेच आजपासून कावड यात्रा (Kawad Yatra 2023) सुरू झाली आहे. यादरम्यान भाविक गंगा नदीतून पाणी भरतात आणि शिवमंदिरात शिवलिंगाला अर्पण करतात. यादरम्यान शिवलिंगावर शिवाला प्रिय वस्तूही अर्पण केल्या जातात.
कावडची सुरुवात कशी झाली?
त्रेतायुगात सर्व प्रथम श्रवणकुमाराने कावड यात्रा सुरू केली असे मानले जाते. ते उना, हिमाचल येथे असताना, त्याच्या अंध पालकांना तीर्थयात्रेला घेऊन जात असताना, त्याच्या पालकांनी त्याला हरिद्वार येथे गंगेत पवित्र स्नान करण्याची इच्छा सांगितली. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रवणकुमारने त्यांना कावडमध्ये बसवले आणि हरिद्वारला नेले. गंगेत स्नान करवले. तेथून त्यांनी गंगाजलही सोबत आणले. तेव्हापासून कावड यात्रा सुरू झाल्याचे मानले जाते.
त्याचबरोबर समुद्रमंथनाच्या वेळी कावड यात्रेची सुरुवात झाल्याचेही मानले जाते. मंथनातून निघालेले विष प्यायल्याने शिवाचा कंठ निळा पडला आणि तेव्हापासून त्याला नीलकंठ म्हटले जाऊ लागले. यासोबतच विषाचा वाईट परिणामही शिवावर झाला. शिवभक्त रावणाने विषाचा प्रभाव दूर करण्यासाठी तपश्चर्या केली. यानंतर दशानं कावंदात जल आणून पुरा महादेवात शंकराचा जलाभिषेक केला. यानंतर शिव विषाच्या प्रभावातून मुक्त झाले.
कावड यात्रेचे नियम
कावड जाणाऱ्या भक्तांना कावडीया म्हणतात. कावड यात्रेला जाणाऱ्या भाविकांना यावेळी विशेष नियमांचे पालन करावे लागते. यादरम्यान भाविकांना पायी प्रवास करावा लागतो. यात्रेदरम्यान भाविकांना शुद्ध अन्न खावे लागते. तसेच विश्रांती घेताना कावड जमिनीवर न ठेवता झाडावर टांगावे लागते.कावड जमिनीवर ठेवल्यास गंगाजल भरून पुन्हा प्रवास सुरू करावा लागतो. कावड यात्रेत भाविकांना अनवाणी पायी जावे लागते. आंघोळीनंतरच कावडला स्पर्श केला जातो. आंघोळ केल्याशिवाय कावडला हात लावला जात नाही.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)