घरात देवाच्या ‘या’ पाच मूर्ती ठेवणे मानले जातं शुभ, नकारात्मक ऊर्जा होईल झटक्यात दूर

 वास्तुशास्त्रात काही गोष्टी घरात ठेवणे शुभ सांगितले जाते. काही खास मूर्ती घरात ठेवल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. अशाच काही शुभ मुर्तींबद्दल जाणून घेऊया ज्या वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवणे अत्यंत फायदेशीर मानल्या जातात.

घरात देवाच्या 'या' पाच मूर्ती ठेवणे मानले जातं शुभ, नकारात्मक ऊर्जा होईल झटक्यात दूर
Follow us
| Updated on: Nov 28, 2024 | 12:43 PM

वास्तुशास्त्रानुसार घरातील ऊर्जेचा थेट परिणाम आपल्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि आर्थिक स्थितीवर होतो. सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि नकारात्मक प्रभावांना दूर ठेवण्यासाठी घरात योग्य मूर्ती असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. काही खास मूर्ती तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी आणण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. अशाच पाच शुभ मुर्तींबद्दल जाणून घेऊया. ज्या वास्तुशास्त्रात अत्यंत फायदेशीर मानल्या जातात.

गणपतीची मूर्ती

गणपतीला अडथळे दूर करणारे आणि शुभाचे प्रतीक मानले जाते. घराच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ किंवा पूजेच्या ठिकाणी गणपतीची मूर्ती ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सर्व कार्यात यश मिळते. गणपतीची मूर्ती बसलेला स्थितीत असावी हे लक्षात असू द्या.

देवी लक्ष्मीची मूर्ती

माता लक्ष्मी ही संपत्ती आणि समृद्धीची देवी आहे. घराच्या उत्तर दिशेला त्यांची स्थापना करणे शुभ मानले जाते. लक्ष्मी देवीच्या मूर्ती सोबत विष्णूची मूर्ती ठेवल्यास ती अधिक शुभ होते. यामुळे घरात सुख – समृद्धी येते आणि सर्व कामात यश प्राप्त होते.

शिवलिंग

शिवलिंग घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि कौटुंबिक कलह संपतात. पूजेच्या ठिकाणी उत्तर – पूर्व दिशेला शिवलिंग ठेवा. तसेच शिवलिंगाला नियमितपणे दूध आणि पाण्याने अभिषेक करणे आवश्यक आहे. असे केल्याने घरातील सदस्यांविषयी प्रेम वाढते.

हनुमानाची मूर्ती

हनुमानाची मूर्ती घरात ठेवल्याने भीती, तणाव आणि नकारात्मकता नष्ट होते. घराच्या नैऋत्य दिशेला हनुमानाची मूर्ती ठेवण्याचा सल्ला दिला जातो. हनुमानाची मूर्ती घरातील सर्व सदस्यांना धैर्य आणि आत्मविश्वास प्रदान करते.

कासवाची मूर्ती

वास्तुशास्त्रात कासवाची मूर्ती संपत्ती आणि दीर्घायुष्याचे प्रतीक मानली जाते. उत्तर दिशेला कासवाची मूर्ती ठेवल्याने आर्थिक स्थिती सुधारते आणि मानसिक शांती मिळते. ही मूर्ती धातूची किंवा स्फटिकाची असावी.

मात्र हे लक्षात असू द्या

  • मूर्ती स्वच्छ आणि शुभ ठिकाणी ठेवा.
  • तुटलेल्या मूर्ती घरात ठेवू नका.
  • मूर्तींची नियमित पूजा आणि साफसफाई केल्याने मूर्तीची सकारात्मकता टिकून राहते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.