अकोल्यातील हिरामाता म्हणजे आराध्य दैवत, परिसरात 200 वर्षांपूर्वीचे वटवृक्ष, विदर्भातील भक्तांची दर्शनासाठी गर्दी

अकोला जिल्हातील मुर्तिजापूर तालुक्यापासून 19 किलोमीटर अंतरावर जामठी गाव वसलेलं आहे. अकोला ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्र 6 वर जामठी फाटा लागतो. तेथून हे गाव अवघ्या अडीच किलोमीटर अगदी हाकेच्या अंतरावर वसलेलं आहे. या गावात हिरामातेचं पुरातन मंदिर आहे

अकोल्यातील हिरामाता म्हणजे आराध्य दैवत, परिसरात 200 वर्षांपूर्वीचे वटवृक्ष, विदर्भातील भक्तांची दर्शनासाठी गर्दी
akola hiramata temple
Follow us
| Updated on: Oct 10, 2021 | 11:23 AM

अकोला : अकोला जिल्हातील मुर्तिजापूर तालुक्यापासून 19 किलोमीटर अंतरावर जामठी गाव वसलेलं आहे. अकोला ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्र 6 वर जामठी फाटा लागतो. तेथून हे गाव अवघ्या अडीच किलोमीटर अगदी हाकेच्या अंतरावर वसलेलं आहे. या गावात हिरामातेचं पुरातन मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे विदर्भातील भक्तांचं आराध्य दैवत आहे. हे मंदिर जेवढं देखणं आहे, तेवढंणच या मंदिरातील हिरामातेची मूर्ति देखील मनाला शांती देणारी आहे. गोल आकाराच्या काळ्या पाषणात ही मूर्ती कोरलेली आहे. त्यावर चांदीचा मुकुट चढवलेला आहे. देवीचं हे मोहक रुप पाहून डोळ्याचं पारणं फिटतं.

वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी केला मंदिराचा जिर्णोद्धार

मिळालेल्या माहितीनुसार इतिहासातील वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी मंदिराचा जिर्णोद्धार केल्याची नोंद आहे. सध्या नवरात्रोत्सव सुरु झाला आहे. हिरामाता मंदिरात नवरात्रोत्सवात नऊ दिवस भक्तांच्या उपस्थीतीत महापूजा व आरती केली जाते. येथे विदर्भासद महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून भाविक दर्शनासाठी येतात. मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरानाचे संकट ओढवल्याने मंदिरपरिसरात भक्तांची वर्दळ कमी आहे.

भक्तांच्या हाकेला धावणारी हिरामाता 

शासनाने धार्मिक स्थळ उघडले असून सध्या येथील व्यवस्थापक तथा भक्तांकडून कोराना नियमाचे पालन केले जातेय. इथल्या हिरामाता मंदीराला शेकडो वर्षाचा इतिहास लाभला असून भक्तांच्या हाकेला धावणारी आणि भक्तांचे संकट दूर करणारी अशी जामठीच्या हिरामाताचे ओळख आहे. हे मंदिर उंच डोंगर दर्‍यात असून आजूबाजूचा परिसर हिरवळीने नटललेला आहे. या मंदिराला लागूनच एक तलाव आहे. एकंदरीत या भागात निसर्गरम्य वातावरण असून याठिकाणी 200 वर्षापूर्वीचे वटवृक्ष असल्याचेही जाणकार वृद्ध सांगतात

7 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात 

दरम्यान, नवरात्र हा एक महत्त्वाचा आणि प्रमुख सण आहे. हा सण संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पौष, चैत्र, आषाढ आणि अश्विन महिन्यात प्रतिपदापासून नवमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. नवरात्रीच्या नऊ रात्री, महालक्ष्मी, महासरस्वती किंवा सरस्वती आणि महाकाली या तीन देवींच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नवरात्रात विशेषकरून देवीची उपासना भक्तांकडून केली जाते. अशा या महान नवरात्र पर्वाला 7 ऑक्टोंबरला सुरुवात करण्यात झाली आहे.

इतर बातम्या :

‘सामना’चं नाव बदलून आता ‘बाबरनामा’ ठेवा, गोपीचंद पडळकरांची शिवसेनेवर जळजळीत टीका

Chipi Airport : ‘मुंबई’च्याउद्धव ठाकरेंचे ‘सिंधुदुर्ग’च्या नारायण राणेंना खास ‘पुणे’री टोमणे!

“सूचनांची नोंद घ्या, मी लक्ष ठेवेल, पहाटे पाचलाच येऊन बघतो,” बारामतीत अजितदादा पुन्हा एकदा ‘कर्तव्यकठोर’

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.