Holashtak and Holi 2021 | का साजरी केली जाते होळी? जाणून घ्या होलाष्टक ते होळीपर्यंतची संपूर्ण माहिती

होळी आणि अष्टक या दोन शब्दापासून ‘होलाष्टक’ हा शब्द तयार झाला आहे. म्हणजेच होळीच्या आठ दिवस आधीच्या काळाला ‘होलाष्टक’ असे म्हणतात (Know details about Holashtak and Holi 2021)

Holashtak and Holi 2021 | का साजरी केली जाते होळी? जाणून घ्या होलाष्टक ते होळीपर्यंतची संपूर्ण माहिती
होळी
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 2:55 PM

मुंबई : होळी आणि अष्टक या दोन शब्दापासून ‘होलाष्टक’ हा शब्द तयार झाला आहे. म्हणजेच होळीच्या आठ दिवस आधीच्या काळाला ‘होलाष्टक’ असे म्हणतात. होलाष्टक 22 मार्चपासून आजपासून सुरु झालं आहे आणि 28 मार्चपर्यंत असेल. हिंदू धर्मग्रंथांनुसार, होलाष्टक दरम्यान नवीन घरात प्रवेश, लग्न, दाढी करणे, मुंडण करणे इत्यादी शुभ क्रिया करण्यास मनाई आहे (Know details about Holashtak and Holi 2021).

होलाष्टकानंतर 28 मार्च रोजी होलिका दहन होणार असून, 29 मार्च रोजी हा उत्सव देशभर रंगांची उधळण करून  जल्लोषात साजरा केला जाईल. चला तर, जाणून घेऊया होलाष्टक ते होळी संबंधित सर्व माहिती…

होलाष्टकासंबंधीची आख्यायिका

असे म्हटले जाते की, हिरण्यकश्यपने आपल्या मुलाच्या हत्येच्या उद्देशाने आपल्या मुलाचा आठ दिवस अनन्वित छळ केला होता. परंतु, भगवान विष्णूची अशी प्रल्हादावर इतकी कृपा होती की, प्रत्येक वेळी त्याचा या संकटातून बचाव झाला. आठव्या दिवशी प्रल्हादाची आत्या होलिका तिच्या मांडीवर प्रल्हादाघेऊन जळत्या अग्नीत बसली होती.

होळीकाला अग्नीने न जाळण्याचा आशीर्वाद दिला होता. परंतु, भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हादाचे प्राण पुन्हा वाचले आणि होलिकाच मरण पावली. तेव्हापासून दरवर्षी होळीच्या आठ दिवस आधी होलाष्टकच्या वेळेस कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. पण होलिका दहन झाल्यावर अर्थात वाईटावर चांगल्याने विजय मिळवल्याचा आनंद साजरा केला जातो. तथापि, ही वेळ भगवान विष्णूची पूजा करण्याची खास वेळ आहे (Know details about Holashtak and Holi 2021).

यंदाच्या होळीला तब्बल 499 वर्षानंतर दुर्मिळ योग

यावेळची होळी खूप खास असणार आहे. तब्बल 499 वर्षांनंतर होळीच्या निमित्ताने अत्यंत दुर्मिळ योग तयार होणार आहे. 29 मार्चच्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र कन्या राशीत विराजमान होईल, तर शनि ग्रह स्वतःच्या राशीमध्ये राहील. असा ग्रह योगायोग 3 मार्च 1521 रोजी झाला होता. त्याशिवाय या वेळी सर्वार्थसिद्धि योगात होळी साजरी करण्यात येणार आहे, त्याचप्रमाणे अमृतासिद्धी योगही या दिवशी येणार आहे .

हा आहे शुभ काळ

होलिका दहनचा दिवस : 28 मार्च 2021

रंगपंचमी दिवस : 29 मार्च 2021

होलिका दहनचा शुभ मुहूर्त : संध्याकाळी 6:37 वाजल्यापासून ते रात्री 8:56 वाजेपर्यंत

पौर्णिमेची तिथी प्रारंभ : 28 मार्च सकाळी 3:27 वाजता

पौर्णिमेची तिथी समाप्ती : 29 मार्च 12:17 वाजता.

बंधुत्वाचा सण होळी

होळीचा सण म्हणजे बंधुत्वाचा सण आहे. लोक आपापसातल्या तक्रारी विसरून हा उत्सव एकमेकांसोबत साजरा करतात आणि एकमेकांना मिठी मारून अभिवादन करतात. यावेळी, रंगांची होळी अर्थात रंगपंचमी खेळली जाते. यंदाही लोक या उत्सवाबद्दल खूप उत्साही आहेत. या उत्सवाची तयारी बरेच दिवस अगोदरच सुरू होते. काही ठिकाणी याची सुरुवात बसंत पंचमीच्या दिवसापासून होते. या दिवशी ढोल-ताशांच्या पूजेनंतर ज्या ठिकाणी होलिका दहन होईल तेथे लाकूड ठेवले जाते.

Know details about Holashtak and Holi 2021

हेही वाचा :

घरात असेल ‘शाळीग्राम’ तर ‘हे’ नियम कटाक्षाने पाळा, अन्यथा विपरित परिणाम होऊ शकतात

शंख वाजवण्याचं महत्त्व काय? शंखाची उत्पत्ती कशी झाली आणि त्याचे फायदे काय?, जाणून घ्या…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.