Vrat-Festivals of April 2022 | चैत्र नवरात्रीपासून कालाष्टमीपर्यंत, जाणून घ्या एप्रिल महिन्यातील व्रत आणि सणांची माहिती
मार्च (March) महिना संपून एप्रिल महिना सुरू होणार आहे. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार एप्रिल (April) हा वर्षातील चौथा महिना आहे. दुसरीकडे, हिंदू कॅलेंडरनुसार , चैत्र महिना सुरू आहे, जो हिंदू (Hindu)नववर्षाचा पहिला महिना मानला जातो.
मुंबई : मार्च (March) महिना संपून एप्रिल महिना सुरू होणार आहे. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार एप्रिल (April) हा वर्षातील चौथा महिना आहे. दुसरीकडे, हिंदू कॅलेंडरनुसार , चैत्र महिन्याची चाहूल लागेल. हा महिना हिंदू (Hindu)नववर्षाचा पहिला महिना मानला जातो. ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने एप्रिल महिना खूप खास मानला जातो कारण या महिन्यात चतुर्थी, एकादशी व्रत आणि प्रदोष व्रत याशिवाय नवरात्री, गुढीपाडवा, रामनवमी, बैसाखी, हनुमान जयंती, गणगौर हे सण येणार आहेत. याशिवाय हा महिना अमावस्या तिथीपासून सुरू होईल आणि अमावस्येला संपेल. या महिन्यातील सर्व उपवास आणि सणांबद्दल येथे जाणून घ्या.
एप्रिल महिन्यात उपवास आणि सण
- 1 एप्रिल: चैत्र अमावस्या, एप्रिल फूल डे
- 2 एप्रिल : चैत्र नवरात्र, गुढी पाडवा
- 3 एप्रिल : रमजानचे उपवास सुरू, झुलेलाल जयंती
- 4 एप्रिल: सोमवार व्रत, गणगौर पूजा, मत्स्य जयंती
- 5 एप्रिल: वरद चतुर्थी, बाबू जगजीवन राम जयंती
- 6 एप्रिल : रोहिणी व्रत
- 7 एप्रिल: यमुना छठ, जागतिक आरोग्य दिन
- 9 एप्रिल : अशोक अष्टमी, दुर्गाष्टमी व्रत
- 10 एप्रिल: पाम रविवार, श्री महातारा जयंती, स्वामीनारायण जयंती, राम नवमी
- 12 एप्रिल: कामदा एकादशी
- 14 एप्रिल: प्रदोष व्रत, मेष संक्रांती, महावीर जयंती, बैसाखी, आंबेडकर जयंती
- 15 एप्रिल: गुड फ्रायडे
- 16 एप्रिल: पौर्णिमा व्रत, हनुमान जयंती
- 17 एप्रिल: इस्टर
- 19 एप्रिल : संकष्टी गणेश चतुर्थी, अंगारकी चतुर्थी
- 22 एप्रिल: पृथ्वी दिवस
- 23 एप्रिल: कालाष्टमी
- 26 एप्रिल: वल्लभाचार्य जयंती, वरुथिनी एकादशी
- 28 एप्रिल : प्रदोष व्रत
- 29 एप्रिल: मासिक शिवरात्री, जमात-उल-विदा
- 30 एप्रिल : अमावस्या
एप्रिल माहिन्यातील महत्त्वाचे सण
हनुमान जयंती आणि पौर्णिमा 16 एप्रिल ही चैत्र महिन्याची पौर्णिमा, तसेच हनुमान जयंती आहे. काही लोक हा दिवस हनुमानजींचा जन्मदिवस म्हणून साजरा करतात, तर अनेक ठिकाणी कार्तिक महिन्यात हनुमान जयंतीही साजरी केली जाते.
एकादशीचे व्रत महिन्यातील दोन एकादशी व्रत 12 एप्रिल आणि 26 एप्रिल रोजी आहेत. 12 एप्रिलला कामदा एकादशी आणि 26 एप्रिलला वरुथिनी एकादशी साजरी केली जाईल. एकादशीचे व्रत हे शास्त्रात श्रेष्ठ आणि मुक्ती देणारे मानले गेले आहे.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
संबंधीत बातम्या :
Panchang Today 24 March 2022, 24 मार्च 2022, जाणून घ्या गुरुवारचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहुकाळ
Swapna Shastra | सावधान ! स्वप्नात या गोष्टी दिसणं म्हणजे अडचणी नक्की येणार, आताच सावध व्हा
लोककला ,संस्कृती , धार्मिक प्रथा- परंपरेचा सुंदर संगम, तळकोकणात शिमगोत्सव साजरा