Akshaya Tritiya 2022: जाणून घ्या अक्षय्य तृतीयेला सोने-चांदी खरेदी का करतात, काय आहे त्याचे महत्त्व
Akshaya Tritiya Festival 2022:पंचांगानुसार 3 मे रोजी पहाटे 5:18 पासून तृतीया तिथी सुरू होईल. 4 मे रोजी सकाळी ७.३२ पर्यंत राहणार आहे. मंगळवारी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 5:39 ते दुपारी 12.18 पर्यंत आहे.
मुंबईः दरवर्षी शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीयेचा (Akshaya Tritiya) सण साजरा केला जातो. यावेळी 3 मे रोजी हा उत्सव साजरा केला जाणार आहे. अक्षय्य तृतीया हा हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक महत्वाचा असा सण मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, हा दिवस प्रत्येकाच्या जीवनात (अक्षय तृतीया) सौभाग्य आणि समृद्धी (Good luck and prosperity) घेऊन येतो. या दिवशी देवी लक्ष्मी, भगवान विष्णू, भगवान कृष्ण आणि भगवान गणेश (अक्षय तृतीया 2022) यांची पूजा केली जाते. या दिवशी दान करणे शुभ मानले जाते. अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीचे (Gold and silver) दागिने खरेदी करण्यालाही शुभ मानले जाते. मात्र याचा तुम्ही कधी विचार केला आहे का, हे असं का केलं जाते, आज आम्ही तुम्हालाच तेच सांगणार आहोत.
अक्षय्य तृतीयेला सोने-चांदी खरेदी करणे शुभ का असते?
अक्षय हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ कायमचा आणि तृतीया म्हणजे तिसरा. असे मानले जाते की अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर कोणतेही दागिने खरेदी केले तर ते नेहमी तुमच्यासोबत राहतात. या दिवशी खरेदी केलेले दागिने अक्षय राहत असतात. लक्ष्मी देवीच्या कृपेने धन स्थिर राहते. पैशाची आणि अन्नाची कमतरता कधीच भासत नाही. हा दिवस तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी घेऊन येतो. यामुळे या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी लोक सोने, चांदी आणि जमीन खरेदी करतात जेणेकरून संपत्तीमध्ये अक्षय वाढ होते. ब्रह्मदेवाचा मुलगा अक्षय कुमारचा जन्मही याच दिवशी झाला होता, असे मानले जाते. म्हणून या दिवसाला अक्षय्य तृतीया म्हणतात. याच दिवशी परशुराम जयंतीही साजरी केली जाते.
लक्ष्मीची पूजा
या दिवशी देशभरातील लोक लक्ष्मीची पूजा करतात यामुळे धन-समृद्धीचे आशीर्वाद प्राप्त होतात. जीवनातील सुख आणि भाग्यासाठी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी लोक नशीब अजमविण्यासाठी मालमत्ता, व्यवसाय आणि दागिने यासारख्या मौल्यवान वस्तूंमध्ये गुंतवणूक करतात. या वस्तू नेहमी शुभ मुहूर्तावर खरेदी केल्या जातात. कोणत्या शुभ मुहूर्तावर आपण या वस्तू खरेदी करू शकता ते तुमच्या हातात आहे.
पूजेचा शुभ काळ
पंचांगानुसार 3 मे रोजी पहाटे 5:18 पासून तृतीया तिथी सुरू होईल. 4 मे रोजी सकाळी ७.३२ पर्यंत राहणार आहे. मंगळवारी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 5:39 ते दुपारी 12.18 पर्यंत आहे.
दागिने खरेदीसाठी शुभ काळ
अक्षय्य तृतीया हा असा दिवस आहे, ज्या दिवशी तुम्ही शुभ मुहूर्ताचा विचार न करता कोणत्याही गोष्टीत तुमचे पैसे गुंतवू शकता. सोने, चांदी किंवा इतर कोणत्याही गोष्टीत गुंतवणूक करण्यासाठी संपूर्ण दिवस फलदायी आहे. याशिवाय हा दिवस लग्न आणि लग्नासाठीही खूप शुभ आहे.