Akshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीयेला दान का करावे?, जाणून घ्या ही पौराणिक कथा

अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2021) म्हणजेच आखा तीज 14 मे शुक्रवारी येत आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी श्रीमंतीची देवी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि सोने खरेदी करण्याची परंपरा आहे.

Akshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीयेला दान का करावे?, जाणून घ्या ही पौराणिक कथा
Akshaya tritiya
Follow us
| Updated on: May 14, 2021 | 8:45 AM

Akshaya Tritiya 2021 Katha : मुंबई : अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2021) म्हणजेच आखा तीज 14 मे शुक्रवारी येत आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी श्रीमंतीची देवी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. पौराणिक मान्यतेनुसार असे केल्याने घरात धन, संपत्ती आणि समृद्धी वाढते आणि जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही (Know The Pouranik Katha Of Akshaya Tritiya And Importance).

शुभ मुहूर्त

? तृतीया प्रारंभ : 14 मे 2021 सकाळी 5 वाजून 38 मिनिटांपासून

? तृतीया समाप्त : 15 मे 2021 सकाळी 7 वाजून 59 मिनिटांनी

? पूजेचा शुभ मुहूर्त : पहाटे 5 वाजून 38 मिनिटांपासून ते दुपारी 12 वाजून 18 मिनिटांपर्यंत

अक्षय्य तृतीयेला यावेळी लक्ष्मी योग बनतो आहे. या योगामध्ये कोणतीही नवीन कामे, जमीन, मालमत्ता आणि सोन्याच्या खरेदीसंबंधित कामे केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात. अक्षय्य तृतीया यावेळी लॉकडाऊनमध्ये येत आहे. म्हणून घरी राहून हा सण साजरा करा. पौराणिक मान्यतांनुसार, देवी लक्ष्मीचा जन्म अक्षय्य तृतीयेच्या दिवशी झाला. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्यावर अक्षय्य तृतीयेची पौराणिक कथेच पठन केल्याने शुभ परिणाम मिळतात. आज आम्ही अक्षय्य तृतीयेची पौराणिक कथा तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत –

अक्षय्य तृतीयेची पौराणिक कथा –

पौराणिक कथेनुसार, शाकल नगरात धर्मदास नावाचा एक वैश्य राहत होते. धर्मदास स्वभावाने अत्यंत आध्यात्मिक होते, जे देव आणि ब्राह्मणांची पूजा करायचे. एक दिवस धर्मदास यांनी अक्षय्य तृतीयेबद्दल ऐकले की ‘वैशाख शुक्लच्या तृतीया तिथीवर देवतांची केलेली पूजा आणि ब्राह्मणांना दिलेलं दान अक्षय्य असते.’

हे ऐकून वैश्य यांनी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गंगेत स्नान केले आणि आपल्या पूर्वजांना अर्पण केले. घरी गेल्यानंतर त्यांनी देवी-देवतांची विधीवत उपासना केल्यावर ब्राह्मणांना अन्न, सत्तू, दही, हरभरा, गहू, गूळ, इत्यादीचं श्रद्धेने दान केलं.

धर्मदास यांची पत्नी त्यांना वारंवार मनाई करत होती, परंतु धर्मदास हे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दान देत असत. काही काळानंतर धर्मदास यांचा मृत्यू झाला. काही काळानंतर त्यांनी द्वारकेच्या कुशावती शहराचा राजा म्हणून पुनर्जन्म घेतला. पौराणिक मान्यतेनुसार, धर्मदादास यांना राजयोग हा पूर्वीच्या जन्माच्या दानच्या प्रभावामुळेच मिळाला.

Know The Pouranik Katha Of Akshaya Tritiya And Importance

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Akshaya Tritiya 2021 : अक्षय तृतीयेला ‘या’ शुभ गोष्टी खरेदी करा, देवी लक्ष्मी प्रसन्न होईल

Akshaya Tritiya 2021 | अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या राशीनुसार दान करा, घरात समृद्धी नांदेल

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.