Lord Shree Krishna | जेव्हा एका भक्तासाठी खुद्द भगवान श्रीकृष्ण साक्ष द्यायला आले! जाणून घ्या ही पौराणिक कथा…

जी व्यक्ती हरिचे नाव घेते तिला वाचवण्यासाठी नारायण स्वत: कलियुगात प्रगट होतात, अशी मान्यता आहे (Lord Shree Krishna Witness His Devotee). आज आम्ही तुम्हाला कलियुगातील एक अशी कहाणी सांगणार आहोत ज्यामुळे हिंदूंची धर्मावरील श्रद्धा आणखी दृढ झाली

Lord Shree Krishna | जेव्हा एका भक्तासाठी खुद्द भगवान श्रीकृष्ण साक्ष द्यायला आले! जाणून घ्या ही पौराणिक कथा...
Lord Krishna
Follow us
| Updated on: Apr 08, 2021 | 4:00 PM

मुंबई : जी व्यक्ती हरिचे नाव घेते तिला वाचवण्यासाठी नारायण स्वत: कलियुगात प्रगट होतात, अशी मान्यता आहे (Lord Shree Krishna Witness His Devotee). आज आम्ही तुम्हाला कलियुगातील एक अशी कहाणी सांगणार आहोत ज्यामुळे हिंदूंची धर्मावरील श्रद्धा आणखी दृढ झाली (Know The Pouranik Katha When Lord Shree Krishna Came To Witness For His Devotee In Front Of People).

या कथेचं वर्णन पुराणातही मिळते. ही कथा भक्त आणि देवाच्या अतूट प्रेमाचं एक उदाहरण आहे

साक्षी गोपाळ नावाच्या एक मंदिरासंबंधी कथा

ही कथा आपल्या देशातील साक्षी गोपाळ नावाच्या मंदिराशी संबंधित आहे. पौराणिक कथेनुसार एकदा दोन ब्राह्मण वृंदावनाच्या प्रवासाला निघाले. त्यातील एक म्हातारा होता तर दुसरा तरुण होता. मार्ग लांब आणि कठीण होता. त्यामुळे त्या दोन्ही प्रवाशांना प्रवासादरम्यान अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. त्या काळी गाड्या किंवा बसची सुविधा नव्हती. प्रवासादरम्यान, तरुण ब्राह्मणाने वृद्ध ब्राह्मणाची खूप मदत केली.

त्यामुळे वृद्ध ब्राह्मणाने वृंदावनला पोहोचल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करीत म्हटलं, “हे तरुण, तू माझी खूप सेवा केलीस. मी तुझा अत्यंत आभारी आहे. या सेवेच्या बदल्यात मी तुम्हाला बक्षीस देऊ इच्छितो. पण त्या तरुण ब्राह्मणाने हा पुरस्कार घेण्यास नकार दिला. त्यानंतर वृद्ध ब्राम्हण जिद्द करु लागला. मग त्या वृद्ध व्यक्तीने आपल्या तरुण मुलीचे लन्ग त्या ब्राह्मण तरुणाशी करण्याचे वचन दिले.

ब्राह्मण तरुणाने त्या वृद्ध व्यक्तीला समजावले की, असे होऊ शकत नाही. कारण तूम्ही खूप श्रीमंत आहात आणि मी खूप गरीब ब्राह्मण आहे. तरीही, वृद्ध ब्राह्मण आपल्या जिद्दीवर ठाम राहिला आणि काही दिवस वृंदावनमध्ये राहिल्यानंतर ते दोघेही घरी परतले.

वृद्ध व्यक्तीने आपल्या मुलीचा विवाह ब्राह्मणाशी निश्चित केला

वृद्ध ब्राह्मण घरी परतल्यानंतर त्याने सर्व काही घरी सांगितलं की, त्याने आपल्या मुलीचे लग्न एका ब्राम्हणाशी निश्चित केले आहे. पण, त्यांच्या पत्नीला हे सर्व मान्य नव्हते. त्या वृद्धाची बायको म्हणाली की, तू माझ्या मुलीचे लग्न त्या युवकाशी केले तर मी आत्महत्या करेन. काही काळानंतर तरुण ब्राह्मणाला काळजी वाटू लागली की वृद्ध ब्राह्मण त्याचं वचन पूर्ण करेल की नाही.

मग तरुण ब्राह्मणाचा संयम सुटला आणि त्याने वृद्ध ब्राह्मणाकडे जाऊन त्यांना त्यांच्या वचनाची आठवण करुन दिली. तो वृद्ध मौन राहिला आणि त्याला भीती वाटत होती की जर त्याने आपल्या मुलीचे लग्न त्या तरुणाशी केले तर त्याची बायको आपला जीव देईल. त्यामुळे वृद्धाने काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा ब्राह्मण तरुणाने त्याला आपल्या वचनाची आठवण करुन दिली. तेव्हा वृद्ध ब्राह्मणच्या मुलाने त्या तरुण ब्राह्मणाला घरातून बाहेर काढलं आणि म्हटलं की तो खोटं बोलतोय आणि त्यांच्या वडिलांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा तरुण ब्राह्मण म्हणाला की, तुझ्या वडिलांनी शिवगृहासमोर हे वचन मला दिलं होतं.

तेव्हा त्या वृद्धाचा मोठा मुलगा, ज्याला देवावर विश्वास नव्हता, त्याने त्या तरुणाला म्हटलं की, जर तू असे म्हणत असशील की देव याचा साक्षी आहे, तर हे बरोबर आहे. जर देव प्रकट होऊन जर ही साक्ष देईल की माझ्या वडिलांनी हे वचन दिले आहे की तू माझ्या बहिणीसोबत विवाह करु शकतो. तेव्हा तरुण म्हणाला, होय मी भगवान श्रीकृष्णाला साक्षी म्हणून यायला सांगेन. त्याला भगवान श्री कृष्णावर पूर्ण विश्वास होता की भगवान श्रीकृष्ण त्याच्यासाठी वृंदावन नक्की येतील.

श्रीकृष्णाने स्वतः भक्तासाठी साक्ष दिली

तेव्हा अचानक वृंदावनच्या मुर्तीतून एक आवाज ऐकू आला, मी तुझ्याबरोबर कसा येऊ शकतो, मी तर फक्त एक मूर्ती आहे. तेव्हा त्या तरुणाने सांगितले की, जेव्हा मूर्ती बोलू शकते तर माझ्यासोबत येऊ पण शकते. तेव्हा श्रीकृष्णाने त्या युवकासमोर एक अट ठेवली, तू मला कोणत्याही दिशेने घेऊन जा, परंतू तू मागे वळून पाहणार नाहीस. तू फक्त माझ्या नुपूरांच्या ध्वनीनेच हे जाणून घेऊ शकशील की मी तुझ्या मागे येत आहे.

त्या तरुणाने कृष्णाची ही अट मान्य केली आणि ते वृंदावनकडे रवाना झाले. ज्या शहरात जायचे होते तेथे पोहोचल्यावर त्या युवकाला नुपूरांचा आवाज येणं बंद झालं. तरुणाचा धीर सुटला आणि त्याने मागे वळून पाहिले. मूर्ती तिथेच स्थिर उभी झाली. आता ती मूर्ती पुढे जाऊ शकत नव्हती कारण त्या युवकाने मागे वळून पाहिले होते.

त्यानंतर तो तरुण धावत नगरात पोहोचला. सर्व लोकांना एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं की पाहा भगवान श्रीकृष्ण साक्षी म्हणून आले आहेत. एवढ्या मोठ्या अंतरावरुन इतकी मोठी मूर्ती इथपर्यंत कशी आली, हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले. मग भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीने सर्वांसमोर ब्राह्मण तरुणाची साक्ष दिली. त्यानंतर वृद्ध ब्राह्मणच्या मुलीशी त्या तरुणाचं लग्न झाले. लग्नानंतर त्या तरुण ब्राह्मणाने श्री वृगृहचा सन्मान म्हणून त्या जागेवर एक मंदिर बांधले आणि आजही लोक या मंदिरात साक्षात् श्री गोपाळाची पूजा करतात.

Know The Pouranik Katha When Lord Shree Krishna Came To Witness His Devotee In Front Of People

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Lord Vishnu | भगवान विष्णूंना प्रसन्न करायचं असेल, तर गुरुवारी ‘या’ मंत्रांचा जप करा…

रामायण काळातील वैशिष्ट्यपूर्ण विमानं, अत्याधुनिक तंत्रज्ञानही का पडते फिके?

BhimKund | या कुंडात पाणी येतं कुठून, वैज्ञानिकही आजपर्यंत शोधू शकले नाही याचा स्त्रोत, जाणून घ्या भीमकुंडाबाबत सर्व माहिती

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.