चांगल्या आरोग्यासाठी फेंगशुईचे ‘हे’ नियम जाणून घ्या; पूर्व दिशेला खबरदारी बाळगली की निरोगी आयुष्यासाठी घडतील चमत्कार

फेंग शुईच्या मते, पूर्व दिशेशी संबंधित मुख्य घटक लाकूड आहे. असे मानले जाते की घर किंवा कार्यालयाच्या पूर्व दिशेला लाकडाचा घटक ठेवल्याने ही दिशा खूप उत्साही राहते आणि त्या इमारतीत राहणाऱ्या लोकांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद लाभतो.

चांगल्या आरोग्यासाठी फेंगशुईचे 'हे' नियम जाणून घ्या; पूर्व दिशेला खबरदारी बाळगली की निरोगी आयुष्यासाठी घडतील चमत्कार
फेंग शुईच्या 'या' चार गोष्टी दुर्भाग्य करतात दूर
Follow us
| Updated on: Oct 06, 2021 | 7:26 AM

मुंबई : निरोगी शरीर असणे हा आपल्या जगण्यातील सर्वात मोठा आनंद समजला जातो. शरीर निरोगी असेल तर माणूस असाध्य गोष्टही साध्य करू शकतो. कोरोना महामारीत आपल्याला आरोग्याकडे लक्ष देणे किती महत्वाचे आहे हे चांगलेच लक्षात आले आहे. फेंग शुईमध्ये आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी पूर्व दिशेशी संबंधित अनेक महत्वाचे नियम सांगितले गेले आहेत. फेंग शुईच्या मते, चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्याचे आशीर्वाद पूर्व दिशेमुळे प्राप्त होतात. याच पार्श्वभूमीवर पूर्व दिशा अधिक ऊर्जावान बनवण्याचा प्रयत्न आपण सर्व बाजूंनी केला पाहिजे. (Know the ‘these’ rules of feng shui for good health)

1. फेंग शुईच्या मते, पूर्व दिशेशी संबंधित मुख्य घटक लाकूड आहे. असे मानले जाते की घर किंवा कार्यालयाच्या पूर्व दिशेला लाकडाचा घटक ठेवल्याने ही दिशा खूप उत्साही राहते आणि त्या इमारतीत राहणाऱ्या लोकांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद लाभतो.

2. फेंग शुईच्या मते, जर तुम्ही लाकडापासून बनवलेले फर्निचर किंवा त्याच्याशी संबंधित गोष्टी जसे झाड, वनस्पती आणि चित्रे लाकडी चौकटी इत्यादी घराच्या किंवा कामाच्या ठिकाणी पूर्व भागात ठेवल्या तर आपल्या अपेक्षित असलेले लाभ अर्थात हव्या त्या गोष्टी पूर्व दिशेने मिळू शकतात.

3. फेंग शुईच्या मते, घराच्या ड्रॉईंग रूममध्ये किंवा जेथे घरातील सर्व लोक एकत्र येतात, तशा सामूहिक बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी बांबूचे छोटेशे रोपटे लावावे, लिव्हिंग रूमच्या पूर्व कोपऱ्यात एका भांड्यात हे रोपटे ठेवा.

4. फेंग शुईच्या मते, पूर्व दिशा शुभ होण्यासाठी घराच्या आत पूर्व दिशेला मातीच्या भांड्यात तीन हिरव्या वनस्पती ठेवा. ही झाडे काटेरी नसतील, याची खात्री करून घ्या.

5. फेंग शुईच्या मते, कोणत्याही दिशेशी संबंधित मुख्य घटकामध्ये त्याचे सहयोगी आणि विरोधी घटक देखील असतात, जे ते दिशेची ताकद मजबूत किंवा कमकुवत करण्याचे काम करतात. उदाहरणार्थ, पूर्व दिशेचा मुख्य घटक लाकूड आहे. तसेच लाकडाचा आधार घटक म्हणून पाणी तर विरोधी घटक धातू आहे. एकीकडे पाणी लाकडाचे पोषण करते. म्हणजेच, पाण्याने सिंचन केल्याने वनस्पतीचे आयुष्य अबाधित राहते, तर पाणी लाकडाला खराब करण्याचे कार्यदेखील करते. अशा स्थितीत फेंग शुईच्या नियमांनुसार पाण्याचे स्रोत, पाण्याचे फवारे इत्यादी पूर्व दिशेला ठेवू नयेत. यामुळे लाकडाच्या घटकाचे नुकसान होते. त्यामुळे फेंग सुईच्या सर्व नियमांचे पालन करून आपल्याला पूर्व दिशेची ऊर्जा सकारात्मक परिणामांसाठी वापरात आणता येऊ शकते. (Know the ‘these’ rules of feng shui for good health)

इतर बातम्या

Remedies of rice : तांदळाच्या या पद्धतीमुळे उजळेल तुमचे नशीब; पैशाची समस्या होईल दूर

Shardiya Navratri 2021 : दुर्दैवाला सुदैवात बदलायचं असले तर नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवीच्या या 5 मंत्रांचा जप नक्की करा

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.