घरात चपला कोणत्या दिशेला ठेवाव्यात? ‘या’ दिशेला ठेवाल तर थेट..

Vastu Tips For Footwear: मानवी जीवनात आनंद, शांती आणि सकारात्मक ऊर्जा आणण्याच्या उद्देशाने वास्तुशास्त्र विकसित करण्यात आले. वास्तुशास्त्र केवळ मानसिक आणि शारीरिक संतुलन प्रदान करत नाही तर जीवनात समृद्धी आणि यश मिळवण्यास देखील मदत करते.

घरात चपला कोणत्या दिशेला ठेवाव्यात? 'या' दिशेला ठेवाल तर थेट..
घरात चपला कोणत्या दिशेला ठेवाव्यात?Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 03, 2025 | 3:38 PM

घरात सुख शांति रहावी यासाठी वास्तूशास्त्राचे पालन करणे उत्तम ठरते. त्याच्या पालनामुळे घर, ऑफिस आणि अन्य जागांमधील उर्जाही संतुलित राहते. पृथ्वी, जल, अग्नि, वायू आणि आकाश या 5 सिद्धांतांवर वास्तूशास्त्र आधारित आहे. आणि त्यांच्याशी निगडीत अथवा संबंधित दिशानिर्देश विचारात घेते. वास्तूशास्त्र हे कोणत्याही गोष्टी ठेवण्यासाठी योग्य दिशेचे ज्ञान देते. आज आपण अशाच एका वास्तु दोषाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याचा संबंध तुमच्या पादत्राणे ठेवण्याच्या दिशेशी असू शकतो.

वास्तूशास्त्रानुसार, घरात चपला अथवा फूटवेअर हे योग्य दिशेत ठेवणे हे महत्वाचे आहे, आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीनेही त्याचे खूप महत्व आहे. वास्तूशास्त्रानुसार, बूट-चपला या नेहमी नैऋत्य दिशेला ठेवणे शुभ असते. ही दिशा नकारात्मक उर्जा नियंत्रित करते आणि सकारात्मक उर्जा कायम राखण्यास मदत करते. याशिवाय पादत्राणे किंवा आपल्या चपला या नेहमी घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवाव्यात. पण त्या चपला घराच्या आत ठेवल्याने घाण होऊ शकते, किंवा जंतू, बॅक्टेरिया पसरू शकतात. त्यामुळे घरातील लोक आजारीदेखील पडण्याची शक्यता असते. आपल्या रोजच्या वापरातले शूज,सँडल्स आणि चप्पल व्यवस्थित ठेवल्याने घर स्वच्छ आणि सुंदर दिसते.

एवढंच नव्हे तर आपल्या चपला बूट हे नेहमीच स्वच्छ, नीटनेटके ठेवावेत. शक्य असेल तर चपला ठेवण्यासाठी एखादा स्टँड किंवा कपाट आणावे आणि त्यातच ही पादत्राणे ठेवावीत. त्यामुळे घर तर स्वच्छ आणि सुंदर तरं दिसतंच पण घरातील उर्जादेखील संतुलित राहते.

मानवी जीवनात आनंद, शांती आणि सकारात्मक ऊर्जा आणण्याच्या उद्देशाने वास्तुशास्त्र विकसित करण्यात आले आहे. वास्तुशास्त्र केवळ मानसिक आणि शारीरिक संतुलन प्रदान करत नाही तर जीवनात समृद्धी आणि यश मिळवण्यास देखील मदत करते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.
'लाडक्या बहिणी'ने पैसे स्वतःहून केले परत, धुळ्यात नेमकं काय घडलं?
'लाडक्या बहिणी'ने पैसे स्वतःहून केले परत, धुळ्यात नेमकं काय घडलं?.
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग...
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग....
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार.
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?.
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?.
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.