Krishna Janmashtami 2022: 18 की 19 ऑगस्ट, कधी साजरी होणार कृष्ण जन्माष्टमी? अनेकांना आहे संभ्रम
श्री कृष्ण जन्माष्टमी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी रोहिणी नक्षत्रात मध्यरात्री मथुरेत झाला होता.
Krishna Janmashtami 2022: यावेळी 18 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी साजरी होणार आहे. या दिवशी ध्रुव आणि वृद्धी योगही तयार होत आहेत. 18 ऑगस्टच्या रात्री 8.42 पर्यंत वृद्धी असेल. यानंतर ध्रुव योग (Druv Yog) सुरू होईल, जो 19 ऑगस्ट रोजी रात्री 8:59 पर्यंत असणार आहे. हिंदू धर्मात हे योग विशेष मानले जातात. या योगात केलेल्या कामाचे फळ शुभ असते. श्री कृष्ण जन्माष्टमी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी रोहिणी नक्षत्रात मध्यरात्री मथुरेत झाला होता. भगवान श्रीकृष्णाची जयंती म्हणून हा सण दरवर्षी देशभर उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी भक्त उपवास ठेवतात आणि मनोभावे देवाची पूजा करतात. या वेळी 18 ऑगस्ट रोजी जन्माष्टमीला ध्रुव आणि वृद्धी योगही तयार होत आहे.
जन्माष्टमी 2022 चा शुभ मुहूर्त
यावेळी 18 ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमी साजरी होणार असल्याचे ज्योतिषी डॉ. विनोद सांगतात. अष्टमी तिथी 18 ऑगस्ट रोजी रात्री 9.20 वाजता सुरू होईल आणि 19 ऑगस्ट रोजी रात्री 10.59 वाजता समाप्त होईल. निशीथ पूजा 18 ऑगस्टच्या रात्री 12:03 ते 12:47 पर्यंत चालेल. निशीथ पूजेचा एकूण कालावधी 44 मिनिटे असेल. पारण 19 ऑगस्ट रोजी पहाटे 5:52 नंतर होणार आहे.
यावर्षी जन्माष्टमीच्या तिथीबाबत बरेच मतभेद आहेत. काही 18 ऑगस्टला तर काही 19 ऑगस्टला जन्माष्टमी असल्याचा दावा करत आहेत. काही जाणकारांचे मत आहे की, भगवान श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथीला रात्री 12 वाजता झाला होता, त्यामुळे 18 ऑगस्ट रोजी हा योग तयार होत आहे. तर काहींच्या मते 19 ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवस अष्टमी तिथी असेल आणि सूर्योदयही याच तारखेला होईल. त्यामुळे 19 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. पण धार्मिक दृष्टिकोनातून श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथीला रात्री 12 वाजता झाला. त्यामुळे हा उत्सव 18 ऑगस्टलाच साजरा केला जाणार आहे.
हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीच्या मध्यरात्री रोहिणी नक्षत्राच्या संयोगात झाला होता. जन्माष्टमीच्या सणाला रोहिणी नक्षत्राचे महत्त्व असते. मात्र यावेळी 18 आणि 19 ऑगस्ट या दोन्ही तारखेला रोहिणी नक्षत्राचा योग होत नाही. हिंदू कॅलेंडरनुसार, 19 ऑगस्ट रोजी कृतिका नक्षत्र रात्री उशिरा 01.53 पर्यंत राहील. यानंतर रोहिणी नक्षत्र सुरू होईल. त्यामुळे यावेळी जन्माष्टमीला रोहिणी नक्षत्राचा योग असणार नाही.