Krishna Janmashtami 2023 : जन्माष्टमीला जूळून येतोय अद्भूत संयोग, जाणून घ्या पूजा विधी आणि मुहूर्त

जेव्हा-जेव्हा पृथ्वीवर पाप आणि अधार्मिकता मर्यादेपलीकडे वाढली आहे, तेव्हा देवाने पृथ्वीवर अवतार घेतला आहे. भगवान विष्णूने पापांचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर अवतार घेतला होता. श्रीकृष्ण हा विष्णूचा अवतार होता.

Krishna Janmashtami 2023 : जन्माष्टमीला जूळून येतोय अद्भूत संयोग, जाणून घ्या पूजा विधी आणि मुहूर्त
कृष्ण जन्माष्टमीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 01, 2023 | 5:24 PM

मुंबई : आपल्याकडे जन्माष्टमी (Krishna janmashtami 2023) उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मुंबईची दहीहंडी तर जग प्रसिद्ध आहे. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या आठव्या तिथीला जन्माष्टमी हा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला असे मानले जाते. यावर्षी जन्माष्टमी 7 सप्टेंबर 2023, गुरुवारी साजरी केली जाणार आहे. यासोबतच या जन्माष्टमीला एक अतिशय शुभ संयोगही निर्माण होत आहे, त्यामुळे या दिवशी पूजा केल्याने अनेक पटींनी अधिक लाभ होतो.

जन्माष्टमीचा दुर्मिळ योगायोग

हिंदी पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 6 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3.37 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4.14 वाजता समाप्त होईल. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला असल्याने जन्माष्टमी उत्सव रात्री साजरा केला जातो. त्यामुळे जन्माष्टमीची तारीख 7 सप्टेंबर मानली जाईल.

पुराणानुसार भाद्रपद कृष्ण अष्टमीच्या मध्यरात्री 12 वाजता रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. यावर्षी जन्माष्टमीला फक्त रोहिणी नक्षत्र राहणार आहे. असा दुर्मिळ योगायोग अनेक वर्षांत घडतो, जेव्हा रोहिणी नक्षत्र, भगवान श्रीकृष्णाच्या जन्माची वेळ, जन्माष्टमीला येते.

हे सुद्धा वाचा

अशा प्रकारे करावी श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा

जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा केली जाते. बाल गोपाळांना सजवून, विधीवत त्यांची पूजा केली जाते. त्यांच्यासाठी पाळणा सजवून त्यामध्ये त्यांना झोका दिला जातो. जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला दूध आणि गंगाजलाने अभिषेक करावा. मग त्यांना नवीन वस्त्र घाला. मोराचा मुकुट लावा. बासरी, चंदन, वैजयती माला यांनी श्रृंगार करा. तुळशीची डाळ, फळे, मखणा, लोणी, साखर मिठाई, सुका मेवा इत्यादी त्यांना नैवेद्य म्हणून अर्पण करा. नंतर दिवा लावावा. शेवटी श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची आरती करून प्रसाद वाटप करावा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.