Krishna Janmashtami 2023 : श्रीकृष्णाची द्वारका समुद्रात का बुडाली? अशी आहे यामागची पौराणिक कथा

गुजरातच्या द्वारका नगरीमध्ये द्वारकाधीश मंदिर आहे. जिथे दरवर्षी देशभरातून आणि जगभरातून लाखो भाविक भेट देतात. गोमती नदीच्या काठावर बांधलेले हे मंदिर अतिशय सुंदर आणि अप्रतिम आहे.

Krishna Janmashtami 2023 : श्रीकृष्णाची द्वारका समुद्रात का बुडाली? अशी आहे यामागची पौराणिक कथा
द्वारका प्रतिकात्मक फोटोImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 07, 2023 | 9:53 AM

मुंबई :  श्रीकृष्ण हे विष्णूचा आठवा अवतार होते. पृथ्वीवरील दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी त्यांनी अवतार घेतला होता. कंसाच्या वधानंतर ते मथुरेचे राजा झाले. यानंतर त्यांनी महाभारताच्या युद्धात अर्जुनाच्या सारथीची भूमिका बजावून धर्म स्थापनेचे महत्त्वपूर्ण कार्य केले. या युद्धानंतर ते मथुरेला परतले. जेव्हा जरासंधने तेथे वारंवार हल्ले करण्यास सुरुवात केली तेव्हा जीवितहानी टाळण्यासाठी ते गुजरातच्या समुद्रकिनारी गेले आणि तेथे द्वारका शहराची स्थापना केली, परंतु नंतर ते शहर नष्ट झाले. प्राचीन द्वारका नगरी (Shri Krishna Dwarka)  समुद्रात विसर्जित झाल्याचे सांगितले जाते. अखेर ते शहर समुद्रात कसे बुडाले? या मागची कथा काय आहे?  याबद्दल काही महत्त्वाचे पैलू जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

शहर वसवण्यासाठी समुद्राला मागितली होती जागा

पौराणिक कथांनुसार भगवान श्रीकृष्णाने आपली द्वारका नगरी स्थापन करण्यासाठी समुद्रातून जागा मागितली होती. भगवान हरींची ही विनंती समुद्र देव नाकारू शकले नाहीत आणि ते मागे फिरले. यानंतर समुद्र माघारी गेलेल्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने द्वारका नगरी वसवली. असे म्हणतात की ते शहर सोन्याचे होते. महाभारताच्या युद्धानंतर भगवान कृष्ण द्वारकेला परतले तेव्हा त्यांनी पाहिले की कुटुंबातील लोकं संपत्तीसाठी आपसात भांडत आहेत. त्यांच्यात द्वेषाची भावनाही वाढत आहे. त्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण ते समजण्या पलिकडचे होते, त्यामुळे कृष्णाला वाईट वाटू लागले.

श्रीकृष्णाच्या प्रस्थानानंतर द्वारका समुद्रात बुडाली

एके दिवशी श्री कृष्ण नदीच्या काठावर बसून बासुरी वाजवत असताना एका शिकाऱ्याचा बाण त्याच्या पायाला लागला. हे निमीत्त्य देखील कृष्णानेच घडवून आणले होते, जेणेकरून ते जगाचा निरोप घेऊ शकती. जेव्हा भगवान श्रीकृष्णांना बाण लागल्याने त्यांचा शेवटचा काळ जवळ आला असे वाटले तेव्हा त्यांनी महासागर देवाला त्यांची जागा परत घेण्याची विनंती केली. यानंतर काही वेळातच त्यांनी जगाचा निरोप घेतला. आपला मानव अवतार पूर्ण करून, जेव्हा भगवान विष्णू क्षीरसागरात गेले तेव्हा समुद्र देवाने विस्तार केला आणि संपूर्ण द्वारका शहर आपल्या कुशीत घेतले त्यामुळे सोन्याने बनलेली द्वारका नगरी कायमस्वरूपी समुद्रात विसर्जित झाली.

हे सुद्धा वाचा

चार धामांपैकी एक आहे द्वारकाधीश मंदिर

गुजरातच्या द्वारका नगरीमध्ये द्वारकाधीश मंदिर आहे. जिथे दरवर्षी देशभरातून आणि जगभरातून लाखो भाविक भेट देतात. गोमती नदीच्या काठावर बांधलेले हे मंदिर अतिशय सुंदर आणि अप्रतिम आहे. असे म्हणतात की हे मंदिर भगवान श्रीकृष्णाचा नातू वज्रभ याने बांधले होते. हे मंदिर 5 मजली आहे आणि 72 खांबांवर स्थापित आहे. या मंदिराचे शिखर सुमारे 78.3 मीटर उंच आहे. हे मंदिर हिंदूंच्या पवित्र चार धामपैकी एक महातीर्थ मानले जाते. या मंदिराचा ध्वज दिवसातून 5 वेळा बदलला जातो. हे अप्रतिम मंदिर चुनखडीने बांधले गेले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.