Krishna Janmashtami 2024 : कृष्ण जयंतीला रात्री हे उपाय जरूर करा, आर्थिक अडचणीतून होईल सुटका

कृष्ण जयंतीचा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कृष्ण जयंतीनंतर दुसऱ्या दिवशी गोपाळकालाचा उत्सव असतो. त्यामुळे रात्री 12 नंतर कृष्ण जन्मोत्सव साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशीची तयारी केली जाते. जन्माष्टमीची रात्र सिद्ध रात्र मानली जाते. या रात्री केलेले ज्योतिषिय उपाय सुख, समृद्धी आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी चांगले ठरू शकतात.

Krishna Janmashtami 2024 : कृष्ण जयंतीला रात्री हे उपाय जरूर करा, आर्थिक अडचणीतून होईल सुटका
Follow us
| Updated on: Aug 22, 2024 | 9:55 PM

कृष्ण जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने देशभरात साजरा केला जातो. रात्री 12 वाजता कृष्ण जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा होतो. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला म्हणजेच यंदा 26 ऑगस्टला श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाईल. या वर्षी कृष्णाचा 5251 वा जन्मोत्सव असणार आहे. या दिवशी कृष्णाच्या बालरुपाची पूजा केली जाते. तसेच अनेक मंदिरांमध्ये मिठाईचा भोग लावला जातो. या दिवशी काही जण उपवास ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी सोडतात. उपवास काळात नुसता कोऱ्या चहावरच अनेक जण दिवस काढतात. दुसऱ्या दिवशी म्हणजेच गोपाळकाला दिवशी उपवास सोडतात. ज्योतिषशास्त्रात कृष्ण जन्माष्टमीचं विशेष महत्त्व आहे. कृष्णाष्टमीच्या रात्रीला सिद्ध रात्री असं संबोधलं जातं. म्हणजेच या दिवशी केलेले उपाय सिद्ध होतात असा ज्योतिषिय अर्थ निघतो. ज्योतिषिय उपायांमुळे जातकांचा इच्छा पूर्ण होतात. तसेच धन वैभव आणि सुख समृद्धी प्राप्त होते.

कृष्ण जन्माष्टमीला हे उपाय ठरतील फायदेशीर

  • जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाच्या बालस्वरूपाचं दर्शन घ्यावं. तसेच दक्षिणावर्ती शंखाने अभिषेक करणं शुभ मानलं जातं. रात्री कृष्ण चालीसा किंवा विष्णु सहस्त्रनामाचा पाठ करावा. यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल.
  • आर्थिक अडचण दूर करण्यासाठी जन्माष्टमीच्या रात्रीच्या रात्री श्रीकृष्णाच्या चरणी विड्याचं पान अर्पण करावं. तसेच दुसऱ्या दिवशी त्या पानावर श्रीयंत्र काढून तिजोरीत ठेवावं. यामुळे पैशांची चणचण दूर होईल.
  • जन्माष्टमीच्या रात्री 12 वाजता श्रीकृष्णांच्या चरणी लोणी आणि साखरेची मिठाई अर्पण करावी. यामुळे भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद लाभेल. तसेच वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील.
  • जन्माष्टमीला लाकडी बासरी घेऊन श्रीकृष्णाला अर्पण करा. श्रीकृष्णाला बासरीची आवड आहे. यामुळे जातकांना संकटातून मुक्ती मिळेल.
  • क्लीं कृष्णाय वासुदेवाय हरि: परमात्मने प्रणत: क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम: या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे अडचणी कमी होण्यास मदत होईल. तसेच अडकलेली कामं मार्गी लागतील.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट.
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात.
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.