तुम्हालाही महाकुंभात शाहीस्नानासाठी जायचंय? तर ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा, अन्यथा वाढू शकताच अडचणी
तब्बल 12 वर्षांनी आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभात कुटुंबासोबत जाण्याचा विचार करत असाल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. अन्यथा अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नक्की कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे हेच या लेखात सांगितलं आहे.

भारतात तब्बल 12 वर्षांनी एकदा महाकुंभ मेळा आयोजित करण्यात येतो. हा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा मानला जातो. यंदा 2025 ला महाकुंभमेळ्याचा योग आला आहे. त्यामुळे करोडोंच्या संख्येनं भाविक महाकुंभात सहभाग होत आहेत. पण याच गर्दीमुळे एक दुर्घटनाही घडली.
महाकुंभात चेंगराचेंगरी
महाकुंभ मेळा यंदा प्रयागराजमध्ये आयोजित करण्यात आला आहे. मौनी अमावस्येच्यानिमित्ताने अनेक भाविकांनी स्नानासाठी प्रचंड गर्दी केली होती. यामुळे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत अनेक भाविक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. 29 जानेवारीला रात्री एक वाजण्याच्या सुमारास घाटाजवळ आंघोळीसाठी जमलेल्या लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली.
त्याचवेळी महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभातील जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. तसेच काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे.
महाकुंभात कुटुंबासोबत जाण्याचा विचार करत असाल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा
त्यामुळे तु्म्हीही महाकुंभात कुटुंबासोबत जाण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार नाही . महत्त्वाचा भाग म्हणजे तिथे गेल्यावर राहायचं कुठे? तर त्याचे नियोजन आधी करा.
राहण्याची व्यवस्था? महाकुंभात जात असाल तर तिथे राहण्याची व्यवस्था अगोदरच करा. हॉटेल, धर्मशाळा किंवा टेंट सिटीमध्ये राहण्याची आगाऊ व्यवस्था करता येते. कारण तेथील गर्दी पाहाता तिथे गेल्यावर राहण्यासाठी जागा शोधणे कठीण होऊ शकते. शेवटच्या क्षणी तुम्हाला हॉटेल किंवा धर्मशाळेसाठी जास्तीचे पैसे द्यावे लागतील. महाकुंभाच्या अगदी जवळचे हॉटेल, धर्मशाळेत जागा उपलब्ध नसेल तर तुम्ही थोड्या अंतरावर असणाऱ्या हॉटेल पाहू शकता. जे की केवळ 15 ते 20 मिनीटांच्या अंतरावर असेल. तेवढं अंतर तर तुम्हाला नक्कीच सोयीचं पडू शकतं.
महत्वाचे कागदपत्रे महाकुंभ मेळ्याला फक्त आवश्यक वस्तू सोबत ठेवा. जसं की पाण्याची बाटली, खाद्यपदार्थ आणि महत्त्वाची कागदपत्रे. जसं की आधार कार्ड, एटीअम वैगरे. पण त्या वस्तू व्यवस्थित ठेवा. तसेच सोबत कमी वस्तू असतील तर त्या सांभाळणेही थोडे सोपे जाते.
गर्दीत फसलात तर काय कराल?
गर्दी म्हटलं की थोडी-फार धक्का लागणे, ढकलून दिले जाणे, जखमी होणे आणि हरवणे यासारख्या परिस्थिती उद्भवू शकतात. अशावेळी एकतर लहान मुले तुमच्यासोबत असतील तर काहीही झालं तर त्यांना आपल्यापासून वेगळं होऊ देऊ नका. तसेच प्रत्येकाकडे आता मोबाईल असतो.
जर चुकून कोणी हरवलच तर एक तर तो पर्याय आहे किंवा, तुम्ही प्रत्येकाच्या गळ्यात एक तयार करून घालू शकता ज्यावर नाव, घराचा पत्ता आणि एक ते दोन मोबाईल क्रमांक असावे. अगदी लहान मुलांच्या गळ्यातही आयकार्ड घाला. जेणेकरून चुकून जरी अशी परिस्थिती समोर आली तरी त्यावरून कुटुंबियांपर्यंत पोहोचन सोपं जातं.
शिवाय गर्दीत चेंगराचेंगरीसारख्या घटना घडतात अशा परिस्थितीत मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे. तसेच कुंभमेळ्याला जाण्यापूर्वी अशी जागा निवडा की कोणीही सदस्य विभक्त झाला तर तो या ठिकाणी पोहोचू शकेल किंवा ठरलेल्या ठिकाणीच येऊन थांबणं शक्य होईल अशी एक जागा नक्की ठरवा.
मुलांना काही गोष्टी विश्वासात घेऊन शिकवा मुलांना तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जात असाल तर त्यांच्या गळ्यात आयकार्डतर घालाच पण त्यांना हे देखील शिकवा की कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, गर्दीत किंवा त्यांच्या कुटुंबापासून विभक्त झाल्यास त्यांनी पोलिस किंवा मदत स्वयंसेवकांची मदत घ्यावी.
तसेच त्यांना देखील एखादी अशी जागा सांगून ठेव जिथे ते स्वत:हा जाऊन थांबू शकतील. तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत जाऊ नये, किंवा त्याने काही दिले तर खाऊ नये हेही सांगून ठेवा.
गर्दी वाढत असेल तर काय कराव?
गर्दी वाढत असेल तर कधी कधी भिती वाटते. छातीत धडधडू लागतं. पण अशा वेळी न घाबरता स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण, तुम्हाला अस्वस्थ पाहून तुमच्यासोबतची मुले किंवा वडीलधारी व्यक्ती देखील घाबरू शकतात. तसेच घाबरल्यामुळे अशा परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग किंवा उपाय सुचत नाही. आणि फक्त विचार सुरु राहतात. त्यासाठी 2 मिनीट शांत राहून आता इथून बाहेर कसं पडू शकतो याचा विचार करा.
औषधे चेंगराचेंगरीसारख्या परिस्थितीत किंवा गर्दीच्या परिस्थितीत दम्याच्या रुग्णांच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे त्यांचा पंप नेहमी त्यांच्याजवळ ठेवा. शिवाय पर्याय म्हणून दोन पंप घेऊन जाऊ शकता म्हणजे चुकन एक हरवला तर दुसरा वापरता येऊ शकतो. तसेच तुमच्याकडे किमान तुम्हाला आवश्यक वाटणारी औषध नक्की जवळ ठेवा.
तर अशा काही गोष्टी लक्षात ठेवत महाकुंभात कुटुंबासोबत जाताना नक्कीच तुम्ही काळजी घेऊ शकता.