Lagnagath: लग्नाच्या विधीत का बांधली जाते गाठ? अनेकांना नाही माहिती यामागचे कारण!

वराच्या खांद्यावर ठेवलेले उपवस्त्र वधूच्या उपवस्त्रासोबत एका गाठीने (Lagnagath) बांधले जाते. ही गाठ का बांधली जाते याचा कधी विचार केला आहे का?

Lagnagath: लग्नाच्या विधीत का बांधली जाते गाठ? अनेकांना नाही माहिती यामागचे कारण!
लग्नगाठImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 19, 2023 | 9:02 PM

मुंबई, जगभरात अनेक धर्मांचे पालन करणारे लोक आहेत. प्रत्येक धर्माची स्वतःची परंपरा असते. वेगवेगळी संस्कृती अंगीकारल्यानंतरही प्रत्येक समाजात विवाह विशेष महत्व आहे. हिंदू धर्मातील विवाहांमध्ये अनेक विधी पाहायला मिळतात. तुम्ही पाहिलं असेल की लग्नादरम्यान वराला वधूसोबत एका गाठीने बांधले जाते. यामध्ये वराच्या खांद्यावर ठेवलेले उपवस्त्र वधूच्या उपवस्त्रासोबत एका गाठीने (Lagnagath) बांधले जाते. ही गाठ का बांधली जाते याचा कधी विचार केला आहे का? जाणून घेऊया या बद्दल काही रंजक माहिती.

यासाठी बांधली जाते गाठ

हे सुद्धा वाचा

हिंदू धर्मात केल्या जाणाऱ्या विधींना विशेष महत्त्व आहे. शास्त्राचे जाणकार सांगतात की, लग्नाचे हे विधी योग्य पद्धतीने पार पाडले गेले नाहीत तर वधू-वरांच्या वैवाहीक जीवनात अनेक अडथळे येतात. वधू आणि वर यांच्यात बांधलेली गाठ एक पवित्र बंधन म्हणून पाहिली जाते. वराचे उपवस्त्र आणि वधूची चुनरी यांच्यामध्ये गाठ बांधली जाते.

या गाठीला वैवाहिक चिन्ह म्हणून पाहिले जाते. ही गाठ वधू-वरांच्या शरीर आणि मनाला बांधून ठेवण्याचे प्रतीक असते.  असे म्हणतात की ही गाठ जितकी मजबूत असेल तितके पती-पत्नीचे नाते अधिक मजबूत आणि प्रेमळ असते. ही गाठ बांधण्याचे काम वराची बहीण करते. ही गाठ केवळ वधू आणि वर यांच्यातील नातेच सांगते असे नाही तर ते दोन कुटुंबांना जोडण्याचेदेखील काम करते.

एक वचन आहे ही गाठ

ही गाठ म्हणजे देवासमोर दिलेले एक प्रकारचे वचन आहे की दोघेही एकमेकांशी एकनिष्ठ राहतील. ही गाठ त्यांच्या भावनिक, शारीरिक आणि मानसिक एकतेचे प्रतीक आहे. या गाठीमध्ये नाणे, तांदूळ, दुर्वा, फुले अशा वस्तू बांधल्या जातात. म्हणजे पती-पत्नीचा संपत्ती आणि धान्यावर समान हक्क असेल. दोघेही आपल्या आयुष्यातील आनंद एकत्र उपभोगतील असा यामागचा अर्थ आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.