ॲप्पल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी देखील महाकुंभला भेट देणार, स्वामी कैलाशानंद यांनी काय दिली माहिती पाहा..

अब्जाधीश लॉरेन पॉवेल प्रयागराज येथे कल्पवास देखील करणार आहे. तसेच सांधूंसारखे व्रत पालन करीत श्रद्धेने सर्व संस्कार करणार आहेत. दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्याप्रमाणे त्यांच्या पत्नी लॉरेन देखील हिंदू आणि बौद्ध धर्माबद्दल आस्था राखून आहेत. आणि अनेक धार्मिक उत्सवात त्या श्रद्धेने सहभागी होत असतात.

ॲप्पल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी देखील महाकुंभला भेट देणार, स्वामी कैलाशानंद यांनी काय दिली माहिती पाहा..
Laurene Powell, wife of Apple founder Steve Jobs, will also visit the Mahakumbh.
Follow us
| Updated on: Jan 10, 2025 | 7:22 PM

महाकुंभ 12 वर्षांतून एकदा भरत असतो. हिंदू धर्माच्या या महामेळाव्यात श्रद्धा आणि संस्कृतीचा संगम होतो. अनेक युगापासून सुरु असलेल्या या परंपरेत मनुष्य मनुष्य प्राण्यास जोडला जातो. यंदा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळावा भरणार आहे. या महाकुंभ-2025 मेळाव्या जगभराती श्रद्धाळु येत आहेत. मिडिया रिपोर्टनुसार या महाकुंभ मेळाव्यास अॅप्पल कंपनीचे सह संस्थापक दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी आणि जगातील अब्जाधीश महिला लॉरेन पॉवेल या देखील उपस्थित रहाणार आहेत. या लॉरेन पॉवेल यांना टाइम्स मॅगझिनने अनेक वेळा जगातील प्रभावशाली श्रीमंत व्यक्ती म्हणून समाविष्ठ केले आहे.

महाकुंभ मेळाव्यात  लॉरेन  कल्पवास देखील करणार आहेत. त्यांना एक हिंदू नाव देखील देण्यात आले आहे. या संदर्भात मीडियाशी बोलताना गुरु स्वामी कैलाशानंदजी महाराज यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की ॲप्पलचे सहसंस्थापक स्वर्गीय स्टीव्ह जॉब्स यांचा साल २०११ मध्ये दुर्धर आजाराने मृत्यू झाला होता. स्वामी कैलाशानंद यांनी सांगितले की त्या आपल्या गुरुला भेटण्यासाठी येथे येत आहेत. आम्ही त्यांना आमचे गोत्रही दिले आहे. आणि त्यांचे नाव ‘कमला ‘ असे ठेवले आहे. त्या आमच्या मुली प्रमाणे आहेत. त्या दुसऱ्यांदा भारताला भेट देत आहेत. महाकुंभ मेळाव्यात त्यांचे स्वागत आहे असेही स्वामी कैलाशानंद यांनी सांगितले.

लॉरेन पॉवेल जॉब्स येथे उतरणार

महाकुंभ मेळाव्यात ६१ वर्षीय लॉरेन पॉवेल जॉब्स य येत्या १३ जानेवारी रोजी येत आहे. यांच्या निवासाची व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. त्या महाराजा डिलक्स कॉटेजमध्ये रहाणार आहेत. निरंजनी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद यांच्या शिबिरात २९ जानेवारीपर्यंत रहाणार आहेत. तसेच सनातन धर्म सजण्याचा प्रयत्न त्या करणार आहेत. याशिवाय १९ जानेवारी सुरु होणाऱ्या कथेच्या त्या पहिल्या सन्मानीय यजमान असणार आहेत.

हे सुद्धा वाचा

स्टीव्ह जॉब्स यांचा देखील विश्वास

आयफोन बनविणारी जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनी ॲप्पल कंपनीचे सह-संस्थापक असलेले स्टीव्ह जॉब्स देखील सनातन परंपरेवर विश्वास ठेवायचे. त्यांनी त्यांच्या जीवनात या संदर्भात अनेक किस्से सांगितले आहे. ते भारतीय साधू संतांना मानतात. त्यात नीम करोली बाबा यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. १९७४ मध्ये स्टीव्ह जॉब्स नीम करोली बाबाच्या दरबारात आले होते. ते त्यांच्या जीवनातील सत्य शोधण्यासाठी ते येथे आले होते. ते कैंची धाम येथे उतरले होते. परमहंस योगानंद यांनी लिहीलेले पुस्तक ‘ऑटोबायोग्राफी ऑफ ए योगी’ देखील त्यांच्यासाठी खास आहे. स्टीव्ह जॉब्स यांनी अनेकवेळा या पुस्तकाला आपल्या जीवनात बदल घडविण्यास जबाबदार ठरविले आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.