AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Law of Karma : माणसाचे कर्म ठरवते त्याच्या जीवनाची दिशा, असा काम करतो कर्माचा नियम

तुम्ही ही म्हण लहानपणापासून ऐकत असाल - "जे पेरले तेच उगवेल!" हा कर्माचा साधा आणि लोकप्रिय नियम (Law Of Karma Marathi) आहे. या भौतिक जगात प्रत्येक जीव कर्म आणि मृत्यूच्या बंधनाने जखडलेला आहे.

Law of Karma : माणसाचे कर्म ठरवते त्याच्या जीवनाची दिशा, असा काम करतो कर्माचा नियम
कर्माचा सिद्धांतImage Credit source: Social Media
| Updated on: Jun 11, 2023 | 4:19 PM
Share

मुंबई : तुम्ही जेव्हा एखादे काम कुठल्यातरी उद्देशाने करता तेव्हा त्याला कर्म म्हणतात. कर्म चांगले आणि वाईट दोन्ही असू शकते. कर्म आपल्या कृतीनुसार त्याचे स्वरूप दर्शविते. कर्म तुम्हाला जीवनाचे महत्त्व समजावून सांगते आणि त्याचे योग्य रीतीने पालन केल्याने कर्म तुमच्या चेतनेला आणि आत्म्याला त्याच्या इच्छित ध्येयापर्यंत पोहोचवण्यास मदत करते. कर्म तुम्हाला सत्याच्या मार्गावर आणते. तुम्ही ही म्हण लहानपणापासून ऐकत असाल – “जे पेरले तेच उगवेल!” हा कर्माचा साधा आणि लोकप्रिय नियम (Law Of Karma Marathi) आहे. या भौतिक जगात प्रत्येक जीव कर्म आणि मृत्यूच्या बंधनाने जखडलेला आहे. मनुष्य जे काही कर्म करतो, त्यातून एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा एकतर सकारात्मक असते किंवा कर्मामुळे निर्माण झालेली ऊर्जा नकारात्मक असू शकते आणि ही ऊर्जा या दैवी आणि अलौकिक विश्वाला तुमच्याबद्दल सांगते.  शेवटी तुम्ही जी काही भावना निर्माण केली असेल त्यानुसार निसर्ग तुम्हाला प्रतिफळ देते.

एखाद्याला कशाची भीती वाटली पाहिजे

कर्माच्या नियमांनुसार माणसाने देवाचे नाही तर स्वतःच्या वाईट कर्मांचे भय बाळगावे. कारण देव तुम्हाला क्षमा करू शकतो. पण तुमची वाईट कृत्ये तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत. पुराणानुसार चांगल्या कर्मांच्या सहाय्याने आपण स्वर्गात जाऊ शकतो तर वाईट कर्म करून नरकाच्या यातना सहन कराव्या लागतात.

इंद्रालाही भोगावे लागले होते त्याच्या कृत्याचे परिणाम

कर्म हा आरसा आहे जो आपल्याला आपला खरा चेहरा दाखवतो. कारण माणूस हा त्याच्या सौंदर्याने नाही तर त्याच्या कर्माने महान बनतो. एखाद्या व्यक्तीने नेहमी अशी कृत्ये केली पाहिजेत, जेणेकरून त्याचा कोणाला तरी उपयोग होईल. कर्माचे सामर्थ्य असे आहे की या कारणामुळे इंद्रालाही स्वर्गातील सुखे आणि ऐश्वर्य उपभोगल्यानंतर सत्कर्मांच्या अभावी पुन्हा निरनिराळ्या जन्मांत भटकावे लागले.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.