leadership skill: ‘या’ राशीच्या स्त्रिया लवकर बनतात बॉस; कार्यालयात असतात कायम चर्चेत!

एखादी व्यक्ती जेव्हा बॉस बनते तेव्हा तिच्या जबाबदाऱ्या वाढतात. या जबाबदाऱ्या सक्षमपणे निभावणे हेसुद्धा एक कौशल्य आहे. काही राशींमध्ये कौशल्य आणि नेतृत्व गुण असल्याने त्यांच्यासाठी प्रगतीचे नवे मार्ग लवकर खुलतात.

leadership skill: 'या' राशीच्या स्त्रिया लवकर बनतात बॉस; कार्यालयात असतात कायम चर्चेत!
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 4:06 PM

जोतिष्यशास्त्रानुसार एकूण १२ राशी (zodiac sign) असतात. प्रत्येक राशींची स्वतःची वैशिष्ट्ये असतात. राशीनुसार लोकांच्या स्वभाव आणि जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेता येतात. आज आपण अशा 3 राशींबद्दल जाणून घेणार आहोत, या राशींच्या स्त्रिया (Women) त्यांच्या कार्यालयात लवकर प्रगती करतात. त्याच्या राशींमध्ये असलेले गुण त्यांना नेतृत्वशाली बनवतात त्यामुळे त्या त्यांच्या कार्यालयीन स्थळी आपला वेगळा ठसा उमटविण्यात यशश्वी ठरतात. त्यांच्यात असलेली जिद्द आणि चिकाटी त्यांना प्रभावशाली (Impactful) बनविते. त्यांच्या या गुणांची दखल कामाच्या ठिकाणी घेतली जाते. परिणामी त्या कमी कालावधीत  बॉस (quickly become bosses) बनण्यास सक्षम ठरतात. एखादी व्यक्ती जेव्हा बॉस बनते तेव्हा तिच्या जबाबदाऱ्या वाढतात. या जबाबदाऱ्या सक्षमपणे निभावणे हेसुद्धा एक कौशल्य आहे. काही राशींमध्ये कौशल्य आणि नेतृत्व गुण असल्याने त्यांच्यासाठी प्रगतीचे नवे मार्ग लवकर खुलतात. संधीचा योग्य फायदा घेतल्यास कमी वेळात बॉस बनणे शक्य आहे.

  1. मेष: या राशीच्या स्त्रियांमध्ये उत्तम नेतृत्व क्षमता असते. त्यांच्या कार्यालयीन स्थळी त्यांचे नेतृत्व कौशल्य अधोरेखित होत असते. ते त्यांचे काम वेळेवर पूर्ण करतात. ते बुद्धिमान आणि मेहनती असतात. ज्याच्या जोरावर ते त्यांच्या कारकिर्दीत खूप लवकर उच्च स्थान प्राप्त करतात. मेष राशीच्या स्त्रिया या स्पष्टवक्त्या असतात. जे मनात आहे तेच त्यांच्या ओठांवर असते. त्या कामाच्या ठिकाणी कटकारस्थान करीत नाही. चुकीच्या गोष्टींना त्या कधीच पाठिंबा देत नाही.
  2. मिथुन: या राशीच्या स्त्रिया बुद्धिमान आणि मेहनती असतात. त्या प्रत्येक काम परिपूर्णतेने करतात. करियरच्या सुरवातीपासूनच त्या अथक परिश्रम घेतात. त्यांच्यात उत्तम नेतृत्व क्षमता असते. उत्तम संभाषण कौशल्यामुळे त्याचे अनेक चाहते असतात. त्यांची बुद्धी अतिशय कुशाग्र असते. त्यांच्या हितशत्रूंवर त्यांचे बारीक लक्ष असते. त्यांच्या विरुद्ध कटकारस्थान रचणाऱ्यांना त्या धोबीपछाड देतात.
  3. कन्या : या राशीच्या स्त्रियासुद्धा कुशाग्र बुद्धीच्या असतात. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ते कमी वेळात खूप प्रगती करतात. त्यांच्या स्वभावाने त्या सर्वांची मने जिंकतात. कन्या राशीच्या स्त्रिया या उत्तम बॉस बनू शकतात. ते त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. त्या प्रतिभावान असतात. कन्या राशीच्या स्त्रियांमध्ये नेतृत्व शैली जन्मतःच असते. अगदी शालेय जीवनापासूनच त्यांना नेतृत्व करण्यात रुची असते. त्यांना सोपविलेले काम त्या प्रामाणिकपणे करतात. यामुळेच त्या कार्यालयातसुद्धा कमी कालावधीत बॉस बनण्यास सक्षम ठरतात.

    (वरील माहिती जोतिष्यशास्त्राच्या आधारे देण्यात आलेली आहे. याचा अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये)

हे सुद्धा वाचा
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.