Hanuman Jayanti 2022 | प्रत्येक देवाकडून मिळाले वरदान असे पवन पुत्र हनुमान, जाणून घ्या कधी आहे हनुमान जयंती , तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धती
हिंदू कॅलेंडरनुसार हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti 2022) दिवशी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाला पौर्णिमेचा सण साजरा केला जातो.
मुंबई : हिंदू कॅलेंडरनुसार हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti 2022) दिवशी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाला पौर्णिमेचा सण साजरा केला जातो. हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. चैत्र (Chaita) महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. यावर्षी 16 एप्रिल रोजी हनुमान जयंती हा पवित्र सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी रामभक्त हनुमानाची पूजा केल्याने विशेष फल प्राप्त होते. पवनपुत्र हनुमानाची (Hanuman) कृपा होण्यासाठी हनुमान जयंतीचा दिवस अतिशय उत्तम मानला जातो. या दिवशी संपूर्ण भारतात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी हनुमानाची पूजा केल्याने तुमचे सर्व कष्ट दूर होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. याशिवाय, या दिवशी विशेष उपाय केल्याने ग्रह दोषांची समस्याही दूर होते, अशी मान्यता आहे.
जाणून घ्या हनुमान जयंतीची योग आणि तिथी
पंचांगानुसार रवि आणि हर्ष योगात हनुमान जयंती साजरी होईल. या काळात हस्त आणि चित्रा नक्षत्र असतील. 16 एप्रिल रोजी हस्त नक्षत्र सकाळी 8.40 पर्यंत राहील, त्यानंतर चित्रा नक्षत्र सुरू होईल. तसेच, या दिवशी रवि योग सकाळी 5.55 वाजता सुरू होत आहे आणि 08:40 वाजता समाप्त होत आहे. 17 एप्रिल रोजी पहाटे 02:45 पर्यंत हर्ष योग राहील.
सर्वच देवांनी दिलंय हनुमानाला वरदान
सूर्यदेवाने
आपल्या तेजाचा शंभरावा भाग भगवान हनुमानाला दिला आहे. यामुळेच हनुमानांचे तेज संपूर्ण जगात पसरले आहे.
यमाकडून मिळालेलं वरदान
:हनुमानजींना धर्मराज यमाकडून वरदान आहे की ते कधीही यमाचा बळी होणार नाहीत. त्यामुळे हनुमान अमर आहेत. आजही या जगात आहेत अशी मान्यता आहे.
कुबेरकडून मिळालेली गदा
बजरंगबलीला कुबेराकडून मिळाली . याशिवाय हनुमानजींना कोणत्याही युद्धात कोणीही पराभूत करू शकत नाही.
ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाले
ब्रह्मदेवाकडून दीर्घायुष्याचे वरदान मिळाले. हनुमानजी त्यांच्या इच्छेनुसार कोणतेही रूप धारण करू शकतात आणि कुठेही जाऊ शकतात.
वरुण देवाकडून विशेष वरदान
वरुण देवाने हनुमानजींना विशेष वरदान दिले होते, ज्यानुसार पाण्यामुळे हनुमानजीचा मृत्यू कघीही होणार नाही.
या दिवशी राशीनुसार नैवेद्य दाखवा
? मेष राशी – बेसनाचे लाडू
? वृषभ राशी – तुळशीचे बियाणे
? मिथुन राशी – तुळशी पत्र
? कर्क राशी – बेसनाचा हलवा
? सिंह राशी – जलेबी
? कन्या राशी – चांदीचा अर्क प्रतिमेवर लावा
? तुळ राशी – मोतीचूरचे लाडू
? वृश्चिक राशी – बेसनाचे लाडू
? धनु राशी – मोतीचूरचे लाडू
? मकर राशी – मोतीचूरचे लाडू
? कुंभ राशी – शेंदुराचा लेप
? मीन राशी – लवंग अर्पण करा
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधीत बातम्या
Vastu Tips : ही चमत्कारी वनस्पती घरामध्ये लावा आणि सुख-समृद्धी मिळवा!
Zodiac | आजचा रविवार ‘या’ 4 राशींसाठी अत्यंत शुभ, धनलाभ होण्याचा योग!