मुंबई : माता यशोदेला पौराणिक ग्रंथात नंद यांची पत्नी असल्याचं सांगण्यात आलं आहे (Vardan To Yashoda Mata). भागवत पुराणात सांगितले जाते की, देवकीचा मुलगा भगवान श्री कृष्ण मथुराच्या राजा कंसच्या तुरुंगात देवकीच्या गर्भातून जन्मला होता. कंसापासून रक्षण करण्यासाठी कृष्णाच्या जन्मानंतर मध्यरात्री जेव्हा वासुदेवाने कृष्णाला यशोदेच्या घरी गोकुळ येथे सोडले, तेव्हा यशोदा आणि नंदने त्यांचे पालनपोषण केले (Lord Vishnu Gave Vardan To Yashoda Mata Know The Katha).
पण तुम्हाला माहितीये का की यशोदाच कृष्णाची आई का झाली? तर त्यामागे एक पौराणिक कथा आहे. यशोदेला भगवान विष्णूने एक वरदान दिले होते, त्यामुळे त्या कृष्णाच्या आई झाल्या.
पौराणिक कथेनुसार, यशोदेने श्रीहरिची घोर तपस्या केली, त्यांच्या तपस्येने प्रसन्न होऊन विष्णूंनी त्यांना वरदान मागण्यास सांगितलं. यशोदेने म्हटलं की, हे ईश्वर! माझी तपस्या तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तुम्ही मला माझ्या पुत्राच्या रुपात प्राप्त व्हाल. भगवानने प्रसन्न होऊन त्यांना सांगितलं की येणाऱ्या काळात मी वासुदेव आणि देवकीच्या घरात जन्म घेईल आणि मला मातृत्वचं सुख तुमच्याकडूनच मिळेल.
यशोदेला नंदची पत्नी म्हटल्या गेलं आहे. भागवत पुराणमध्ये हे सांगण्यात आलं आहे की, देवकीचा पुत्र भगवान श्री कृष्णाचा जन्म देवकीच्या गर्भातून मथुराचा राजा कंसच्या तुरुंगात झाला. कंसापासून रक्षा करण्यासाठी वासुदेवाने कृष्णाच्या जन्मानंतर मध्यरात्री त्यांना यशोदेच्या घरी गोकुळमध्ये सोडलं आणि त्यानंतर त्यांचं पालन पोषण यशोदेने केलं.
कृष्णाच्या बाललीलांचे असंख्य वर्णन भारताच्या पुरातन धार्मिक ग्रंथांत आढळतात. ज्यामध्ये यशोदेला ब्रम्हांडाचे दर्शन, लोणी चोरणे आणि त्याला दोरखंडाने ओखळांना बांधणे अशा असंख्य घटनांचे सजीव वर्णन सूरदासने केले आहेत. यशोदेने बलरामच्या पालन पोषणासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती.
भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा वियोग का झाला होता? जाणून घ्या देवी लक्ष्मीच्या स्वयंवराची अनोखी कहाणीhttps://t.co/HKbuJ21qXd#LordVishnu #GoddessLakshmi
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 2, 2021
Lord Vishnu Gave Vardan To Yashoda Mata Know The Katha
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Somvati Amavasya 2021 | सोमवती अमावस्या कधी, जाणून घ्या महत्त्व आणि शुभ मुहूर्त…
जेव्हा पांडव आणि महादेव यांच्यात युद्ध झालं, जाणून घ्या नेमकं काय झालं होतं?
Chaitra Navratri 2021 | घट स्थापनेच्या दिवशी शुभ योग, हे उपाय करा, कौटुंबिक आणि आर्थिक समस्या सुटतील