सोपं नसतं महिला नागा साधू होणं, द्याव्या लागतात अनेक कठीण परीक्षा, कसा असतो दिनक्रम?
नागा साधूमध्ये दोन प्रकार पडतात काही साधू हे वस्त्र घालतात, तर काही साधू हे वस्त्राचा त्याग करतात. नाग साधूची दिक्षा घेतल्यानंतर हे साधू आपल्या अंगावर एकही वस्त्र ठेवत नाहीत.
प्रयागराजमध्ये आजपासून महाकुंभ मेळावा सुरू झाला आहे. पहिल्या अमृत स्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. महाकुंभ मेळाव्यात सहभागी होण्यासाठी लाखोंच्या संख्येनं नागा साधू प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. नागा साधूंबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहेच. मात्र आज आपण महिला नागा साधूंबद्दल जाणून घेणार आहोत, आज तुम्ही महिला नागा साधूंबद्दल ज्या गोष्टी जाणून घेणार आहात, त्या गोष्टी कदाचित तुम्हाला यापूर्वी माहिती देखील नसतील.
नागा साधूमध्ये दोन प्रकार पडतात काही साधू हे वस्त्र घालतात, तर काही साधू हे वस्त्राचा त्याग करतात. नाग साधूची दिक्षा घेतल्यानंतर हे साधू आपल्या अंगावर एकही वस्त्र ठेवत नाहीत. मात्र तुम्हाला माहिती आहे का? की महिला देखील नागा साधूची दिक्षा घेतात. मात्र या नागा साधू बनलेल्या महिला वस्त्र परिधान करतात. महिला नागा साधूला आपल्या कपाळावर एक मोठा टिळा लावावा लागतो. त्यांना वस्त्र परिधान करण्याची परवानगी दिली जाते, ज्याचा रंग हा भगवा असतो.
वस्त्र न शिवताच परिधान करतात
महिला नागा साधू यांना वस्त्र परिधान करण्याची परवानगी असते, मात्र त्या कपडे न शिवता परिधान करतात. ज्याला गंती असं म्हटलं जातं. नागा साधू बनण्यापूर्वी त्या महिलेला कमीत कमी 6 ते 12 वर्ष ब्रह्मचर्य व्रताचं पालन करावं लागतं. जेव्हा ती महिला हे व्रत पूर्ण करते तेव्हा या महिलेला तिच्या गुरूकडून महिला नागा साधू बनण्याची परवानगी दिली जाते.
स्वत:च पिंडदानही करावं लागतं
महिला नागा साधूला हे सिद्ध करावं लागतं की ती आता पूर्णपणे ईश्वराला समर्पित झाली आहे. बाहेरच्या जगाशी तिचा काहीही संबंध उरलेला नाहीये. त्यासाठी तिला तिच्या जिवंतपणीच स्वत:चं पिंडदान देखील करावं लागतं. पिंडदानानंतर तिचा बाह्यजगाशी असलेला सर्व संबंध संपुष्टात येतो.आखाड्याचे सर्वोच्च पदादिकारी आचार्य महामंडलेश्वर यांच्याकडून महिला नागा साधूला दिक्षा दिली जाते. महिला नागासाधू या दिवसभर ईश्वराचं नामस्मरण करतात.