Mahabharat Story : महाभारत लिहायला किती वर्ष लागली होती? गणपतीने महर्षी व्यासांसमोर ठेवली होती ‘ही’ अट

भगवान गणेशाने स्वतःच्या हाताने महाभारत (Mahabharat Story) काव्य लिहिले. पौराणिक कथेनुसार, शिक्षणासोबतच श्रीगणेशाला लेखनाचाही स्वामी मानले जाते. गणेशाला सर्व देवतांमध्ये सर्वात धैर्यवान मानले गेले आहे.

Mahabharat Story : महाभारत लिहायला किती वर्ष लागली होती? गणपतीने महर्षी व्यासांसमोर ठेवली होती 'ही' अट
महर्षी वेद व्यास आणि श्री गणेश Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 24, 2023 | 10:15 AM

मुंबई : गणपतीला आद्य देवता मानले जाते. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशाचे ध्यान केले जाते. असे मानले जाते की कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशाची पूजा आणि स्तुती केल्याने कामातील अडथळे दूर होतात. म्हणूनच गणपतीला विघ्नहर्ता असेही म्हणतात. भगवान गणेशाने स्वतःच्या हाताने महाभारत (Mahabharat Story) काव्य लिहिले. पौराणिक कथेनुसार, शिक्षणासोबतच श्रीगणेशाला लेखनाचाही स्वामी मानले जाते. गणेशाला सर्व देवतांमध्ये सर्वात धैर्यवान मानले गेले आहे. त्यांचे मन स्थिर आणि शांत असल्याचे सांगितले जाते. परिस्थिती कशीही असली तरी त्यांचा संयम सुटत नाही. आपले काम शांतपणे करत राहातात. या कारणास्तव त्यांची लेखन शक्ती देखील अद्वितीय मानली गेली आहे. गणेशाच्या या गुणाने महर्षी वेद व्यास प्रभावित झाले.

गणपतीने महर्षी व्यासांसमोर ठेवली होती ही अट

महर्षि वेदव्यास यांनी जेव्हा महाभारत रचण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ते महाभारतासारख्या महाकाव्यासाठी अशा लेखकाच्या शोधात होते, जो त्यांच्या कथन आणि विचारांमध्ये व्यत्यय न आणता लेखन करत राहील. कारण जेव्हा एखादा अडथळा येतो तेव्हा विचारांच्या निरंतर प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.

महर्षी वेद व्यास यांनी सर्व देवी-देवतांच्या क्षमतांचा अभ्यास केला पण ते समाधानी झाले नाहीत तेव्हा त्यांचे लक्ष गणेशाकडे वेधले गेले. महर्षी वेद व्यासांनी गणेशाजवळ जाऊन एक महाकाव्य लिहिण्याची विनंती केली. भगवान गणेशजींनी वेद व्यासजींची विनंती मान्य केल पण त्यांच्यासमोर एक अट ठेवली. अटीनुसार, लिखान सुरू केल्यानंतर, एक क्षणही कथा सांगणे थांबता येणार नाही, आणि असे झाल्यास ते लिखानाचे काम तिथेच थांबवतील. महर्षी वेद व्यास यांनी गणपतीची ही अट मान्य केली, पण त्यांनी गणेशासमोर एक अटही ठेवली. महर्षी वेद व्यास म्हणाले की मी सांगीलेल्या श्लोकाचा अर्थ लिहीन्याआधी तुम्हाला समजून सांगावा लागेल.

हे सुद्धा वाचा

याचा अर्थ गणेशाला प्रत्येक शब्द समजून घेऊनच लिहायचे होते. महर्षी वेद व्यास यांची ही अट गणपतीने मान्य केली. यानंतर महाभारत महाकाव्याची रचना सुरू झाली. महाभारताचे लेखन पूर्ण होण्यास तीन वर्षे लागली असे म्हणतात. या तीन वर्षांत गणपतीने महर्षी वेद व्यासांना एक क्षणही थांबवले नाही, तर महर्षींनीही त्यांची अट पूर्ण केली. अशा प्रकारे महाभारत पूर्ण झाले.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.