Nashik, Chandwad Yatra : महादेव, पार्वती, रावण, वेताळ, खंडेराय थेट भेटीला; चांदवडचा आखाडी उत्सव दणक्यात
तब्बल 12 वर्षानंतर हा उत्सव पार पडत आहे. त्यामुळे चांदवडच नव्हे तर नाशिक आणि नाशिकच्या बाहेरूनही हा सोहळा पाहण्यासाठी लोक आले होते. त्यामुळे यात्रेत तुफान गर्दी झाली होती. या सोहळ्यात महिलांचा सर्वाधिक सहभाग होता.
चांदवड,नाशिक : नाशिकहून (Nashik) 60 किलोमीटरवर मुंबई- आग्रा रोडजवळ वसलेलं गाव चांदवड (Chandwad) चांदवडमध्ये प्रवेश करताना सह्याद्री पर्वत रांगा लागतात. सातमाळ्यांच्या या डोंगररांगा आपल्यासोबत धावत आहेत की काय असा भास आपल्याला होतो. चांदवड म्हणजे वडाची व्याप्ती चंद्रापर्यंत गेली आहे ते चांदवड. त्यामुळे यागावाला चांदवड असं म्हणतात. शहरातील धार्मिक उत्सवांमध्ये प्रमुख मानल्या जाणाऱ्या पारंपरिक आखाडी देवी उत्सवास रविवारपासून सुरवात झाली. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या उत्सवात तब्बल १२ वर्षांनी या उत्सवाला सुरवात झाल्याने आनंदाच्या वातावरणात चमुचे भक्तिगीते नंतर शारदा आणि गणपतीचे सोंग नाचवण्यात आले तसेच उत्सवस्थळी आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली.या उस्तवात गणपती-शारदा, भीम-बकसुर ,वीरभद्र, कच्छ-मच्य,बाळंतीण बाई, महादेव-पार्वती, एकादशी, कुंभकर्ण, रावण, वेताळ, नारशिह, खंडेराय यांचे सोंगे नाचवण्यात आले. या यात्रेची प्रमुख आकर्षण असलेल्या देवी व म्हसोबा यांची सोंगे शुक्रवारी 20 तारखेला पहाटे निघणार आहेत. त्यानंतर यायात्रेची त्यातील उत्सवाची सांगता होणार आहे.
पारंपारिक गणवेश, संगीत आणि नृत्य
आजपासून सुरू झालेल्या या आखाडी उत्सवासाठी संपूर्ण परिसर विद्यूत रोषणाईने उजळून गेला होता. यात्रा काढण्यात आली. या यात्रेत पारंपारिक संगीत वाजवण्यात आलं. यावेळी पारंपारिक वेषातील गणपती आणि शारदा देवीचे सोंग नाचवण्यात आले. या उत्सवात गणपती-शारदासह भीम-बकासूर, वीरभद्र, कच्छ-मच्छ, बाळंतीण बाई, महादेव-पार्वती, एकादशी, कुंभकर्ण, रावण, वेताळ, नरसिंह, खंडेराय आदींचे सोंग नाचवण्यात आले. हे सोंग पाहण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली होती.
12 वर्षानंतरचा सोहळा, तुफान गर्दी
तब्बल 12 वर्षानंतर हा उत्सव पार पडत आहे. त्यामुळे चांदवडच नव्हे तर नाशिक आणि नाशिकच्या बाहेरूनही हा सोहळा पाहण्यासाठी लोक आले होते. त्यामुळे यात्रेत तुफान गर्दी झाली होती. या सोहळ्यात महिलांचा सर्वाधिक सहभाग होता. पुरुषांची संख्याही लक्षणीय होती. चांदवडमधील गल्ल्यांमध्ये अलोट गर्दी उसळल्याने पाय ठेवायलाही जागा नव्हती. यावेळी अनेकांनी हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. या संपूर्ण कार्यक्रमाचे चित्रीकरणही करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.