Mahashivratri 2021 | महाशिवरात्रीच्या रात्री जागरणाचं महत्त्व काय? जाणून घ्या…

हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिना वर्षाचा शेवटचा महिना असतो. या महिन्यात कृष्ण पक्षाची (Importance Of Jagran On Mahashivratri) चतुर्दशीला महाशिवरात्रीचा सण येतो.

Mahashivratri 2021 | महाशिवरात्रीच्या रात्री जागरणाचं महत्त्व काय? जाणून घ्या...
आज वर्षातील सर्वात मोठी शिवरात्री म्हणजेच महाशिवरात्रीचा सण आहे.
Follow us
| Updated on: Mar 04, 2021 | 7:43 AM

मुंबई : हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिना वर्षाचा शेवटचा महिना असतो. या महिन्यात कृष्ण पक्षाची (Importance Of Jagran On Mahashivratri) चतुर्दशीला महाशिवरात्रीचा सण येतो. मान्यता आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवासाठी उपवास केल्याने आणि पूजा केल्याने ते अत्यंत प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात (Mahashivratri 2021 Know The Importance Of Jagran On Mahashivratri Night).

या वर्षी महाशिवरात्री 11 मार्च 2021 ला येत आहे. हिंदू शास्त्रात महाशिवरात्रीला पूर्ण रात्रभर जागरण करत महादेवाची उपासना करण्यास सांगण्यात आलं आहे. चला जाणून घेऊ महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करण्याचे अध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व…

महाशिवरात्रीचं धार्मिक महत्व काय?

महाशिवरात्रीला मोठं धार्मिक महत्त्व आहे. महाशिवरात्रीची रात्र ही भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाची रात्र मानलं जातं. या दिवशी महादेवांनी वैराग्य जीवनातून गृहस्थ जीवनात पाऊल ठेवलं होतं. ही रात्र शिव आणि पार्वती मातेसाठी अत्यंत विशेष मानली जाते.

मान्यतेनुसार, जे भाविक या रात्री जागरण करुन महादेव आणि त्यांची शक्ती माता पार्वतीची उपासना आणि भजन वगैरे करतात त्या भक्तांवर शिव आणि माता पार्वतीची विशेष कृपा असते. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनातील अनेक कष्ट दूर होतात. त्यामुळे महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करायला हवं.

महाशिवरात्रीचं वैज्ञानिक महत्त्वही जाणून घ्या

वैज्ञानिक दृष्टीने पाहायचं झालं तर महाशिवरात्रीच्या रात्र अत्यंत विशेष असते. या रात्री ग्रहांचा उत्तरी गोलार्द्ध या प्रकारे उपस्थित असतात की मनुष्याच्या आतील ऊर्जा प्राकृतिक रुपात वरच्या दिशेने जाऊ लागते. म्हणजेच प्रकृती स्वत: मनुष्याला त्याच्या अध्यात्मिक शिखरापर्यंत जाण्यास मदत करते.

धार्मिक दृष्टीने पाहायला गेलं तर प्रकृती त्या रात्री मनुष्याला परमात्माशी जोडते. याचा पूर्ण फायदा लोकांना मिळायला हवा म्हणून महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करुन आणि ध्यान मुद्रामध्ये बसण्याचं सांगण्यात आलं आहे.

मासिक शिवरात्रीपेक्षा महाशिवरात्री वेगळी

प्रत्येक महिन्याच्या अमावस्येच्या एक दिवसाआधी म्हणजेच कृष्ण पक्ष चतुर्दशीला शिवरात्री म्हटलं जातं. पण, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते. या प्रकरणी ज्योतिषांच्या मते, प्रत्येक महिन्याच्या अमावस्येच्या रात्री चंद्र पूर्णपणे क्षीण असतो. अशा परिस्थितीत महिन्याच्या क्षय होणार्‍या अमावस्येच्या परिणामापासून वाचवण्यासाठी अमावस्येच्या एका रात्री आधी चतुर्दशी तिथीला शिवरात्री साजरी केली जाते. यादिवशी महादेवाची आराधना केली जाते.

त्याचप्रकारे हिंदू नववर्ष सुरु होण्याच्या एक महिन्यापूर्वी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्रीच्या रात्री पूजा केली जाते. जेणेकरुन क्षय होणाऱ्या वर्षाच्या दुष्प्रभावापासून नवीन वर्षात रक्षा व्हावी.

Mahashivratri 2021 Know The Importance Of Jagran On Mahashivratri Night

संबंधित बातम्या :

Gopeshwar Mahadev | या मंदिरात महिलेच्या रुपात महादेव विराजमान, श्रुंगारानंतर पूजा-अर्चना

Kaal Bhairav | कोण आहेत काळ भैरव? ज्यांच्या उपासनेने दूर होतात मोठी विघ्ने, जाणून घ्या…

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.