MahaShivratri 2021 | तुळशीची पानं आणि केतकीचं फुलं महादेवाला वर्ज्य, जाणून घ्या या मागील पौराणिक कथा

तुम्हाला माहितीये का की महादेवाला तुळशीची पानं आणि केतकीची फुलं वर्ज्य मानली जातात (Why The Tulsi And Ketaki Flower Do Not Offer To Lord Shiva).

MahaShivratri 2021 | तुळशीची पानं आणि केतकीचं फुलं महादेवाला वर्ज्य, जाणून घ्या या मागील पौराणिक कथा
या दिवशी भक्त पहाटे उठून स्नान करतात आणि मंदिरात पाणी आणि दुधाचा अभिषेक करतात आणि प्रार्थना करतात.
Follow us
| Updated on: Mar 07, 2021 | 11:00 AM

मुंबई : महाशिवरात्रीचा सण (MahaShivratri 2021) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शिवभक्त भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारे त्यांची पूजा करतात. अनेक भाविक साप्ताहिक सोमवारी उपवासही ठेवतात. सर्व देवी- देवतांमध्ये भगवान शिव हे एकमेव असे देव आहेत जे भक्तांच्या भक्तीने पूजा-अर्चनेने लवकर प्रसन्न होतात. भगवान शिवला आदी अनंत मानलं जातं (Why The Tulsi And Ketaki Flower Do Not Offer To Lord Shiva).

महादेवाला प्रसन्न करण्यासाठी भांग, धतुरा, बेलपत्र आणि आक सारख्या वस्तू अर्पित केल्या जातात. पण, तुम्हाला माहितीये का की महादेवाला तुळशीची पानं आणि केतकीची फुलं वर्ज्य मानली जातात. चला यामागील कारणं जाणून घेऊ….

महादेवांना केतकीचे फूल का चढवले जात नाही?

पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णू आणि ब्रह्मा जी यांच्यात वाद झाला की कोन मोठा आणि कोण लहान. दोन्ही देवता याचा निर्णय करण्यासाठी भगवान शिवकडे गेले. भगवान शिवने एक शिवलिंग प्रकट करत सांगितलं की जो त्याच्या आदि आणि अंत शोधून काढेल तोच सर्वात मोठा असेल. यानंतर भगवान विष्णू वरपर्यंत गेले. पण, या शिवलिंगची सुरुवात नेमकी कुठून झाली याचा शोध ते नाही घेऊ शकले. तर ब्रह्मा जी खालच्या बाजूने गेले पण, त्यांनाही या शिवलिंगचा शेवट सापडला नाही.

खाली जाताना त्यांची नजर एका केतकीच्या फुलावर पडली. जे त्यांच्यासोबतच जात होतं. ब्रह्माजींनी केतकीच्या फुलाला खोटं बोलण्यासाठी तयार केलं. त्यांनी भगवान शंकरजींना सांगितलं की त्यांनी या शिवलिंगच्या शेवटाचा शोध लावला आहे आणि त्यासाठी केतकी पुष्पाकडून ग्वाहीही दिली. मात्र, भगवान शंकरजींनी ब्रह्नाजींचं खोटं पकडलं. त्यांनी त्याच वेळी खोटं बोलणाऱ्या ब्रह्माजींचं शिर कापलं आणि केतकीच्या फुलाला आपल्या पूजेतून वंचित केलं. त्यामुळे महादेवाला केतकीचे पुष्प अर्पण केले जात नाहीत.

महादेवांना तुळस का चढवली जात नाही?

पौराणिक कथेनुसार, तुळशीचं नाव वृंदा होतं आणि ती जालंधर नावाच्या राक्षसची पत्नी होती. तो आपल्या पत्नीचा छळ करायचा. भगवान शिवने विष्णूजींना जालंधरला धडा शिकवण्यास सांगितलं. तेव्हा भगवान विष्णूजींनी कपट करत वृंदाचा पतिव्रता धर्म भंग केला.

जेव्हा वृंदाला याची माहिती मिळाली तेव्हा तिने भगवान विष्णूला श्राप दिला की तुम्ही दगडाचे होऊन जाल. तेव्हा विष्णूजींनी तिला सांगितलं की मी तुझी जांलधरपासून रक्षा करत होतो. त्यानंतर विष्णूजींनी तिला श्राप दिला की वृंदा लाकूड बनेल. त्यानंतर वृंदा तुळशीचं रोपटं बनली. तुळशीचा संबंध भगवान विष्णूसोबत आहे, म्हणून शंकराला तुळस वर्ज्य आहे.

Why The Tulsi And Ketaki Flower Do Not Offer To Lord Shiva

संबंधित बातम्या :

Gopeshwar Mahadev | या मंदिरात महिलेच्या रुपात महादेव विराजमान, श्रुंगारानंतर पूजा-अर्चना

Mahashivratri 2021 | महाशिवरात्रीच्या रात्री जागरणाचं महत्त्व काय? जाणून घ्या…

Janaki Jayanti 2021 | राजा जनक नाही, रावणाची पुत्री होती माता सीता! वाचा काय सांगतं अद्भुत रामायण…

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.