Mahashivratri 2023: महाशिवरात्रीला रूद्राभीषेकाचे आहे विशेष महत्व, जाणून घ्या विधी आणि महत्व
रूद्र अभिषेक ही शंकरांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत प्रभावी अशी पूजा आहे. सर्वसामान्यपणे रुद्राभिषेक हे शिवालयाच्या ठिकाणी केल्यास त्वरित प्रभाव करते. भक्तांचे मनोरथ रुद्राभिषेकानी पूर्ण होतात.
मुंबई, संस्कृत पुराण साहित्य पैकी अग्निपुराण, शिवपुराण, पद्मपुराण या ग्रंथांमध्ये महाशिवरात्री (Mahashivratri 2023) व्रताचे महत्त्व सांगितले आहे. या दिवशी बेलाची पाने वाहून शिवाची पूजा करावी असे या व्रताचे स्वरूप आहे. महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्त्व आहे. या दिवशी शंकरपार्वती यांचा विवाह झाला होता, यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात काढतात. हे व्रत दीड दिवसाचे असते, त्यामुळे त्यांच्या दुसऱ्या दिवशी सकाळी हे व्रत समाप्त होते. दुसऱ्या दिवशी महिला ब्राह्मण भोजन घालत पतीचा आशिर्वाद घेऊन महाशिवरात्रीच्या व्रताचा समारोप घेतात.
रूद्र अभिषेक ही शंकरांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत प्रभावी अशी पूजा आहे. सर्वसामान्यपणे रुद्राभिषेक हे शिवालयाच्या ठिकाणी केल्यास त्वरित प्रभाव करते. भक्तांचे मनोरथ रुद्राभिषेकानी पूर्ण होतात. महादेवाची संपुर्ण कृपा प्राप्त करण्यासाठी रुद्राभिषेक केले जाते. केवळ ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी, अथवा महाशिवरात्री, प्रदोष किंवा श्रावणी सोमवार असताना रुद्राभिषेक केल्यास अधिक फलदायी असते व बाधा उत्पन्न होत नाही. कारण या कालावधीत श्री शंकर हे शिवलिंगाच्या ठिकाणी उपस्थित असतात.
या कालावधीत करा रूद्राभीषेक
यंदा महाशिवरात्री 18 फेब्रुवारीला सायंकाळी 5.43 वाजल्यापासून सुरू होणार असून 19 फेब्रुवारीला दुपारी 3.29 पर्यंत चालणार आहे. शिवविवाह रात्री होत असल्याने 18 फेब्रुवारीलाच महाशिवरात्री साजरी होणार आहे. त्यांनी पुढे सांगितले की, या तिथीला षोडशोपचार पद्धतीनुसार पूजा करावी. या वर्षी महाशिवरात्रीला शनि, बुध आणि चंद्र मकर राशीत राहतील. या तीन ग्रहांनी मिळून त्रिग्रही योग तयार केला आहे, जो दुर्मिळ योग आहे.
अशा प्रकारे साजरा करा महाशिवरात्रीचा सण
शिवरात्री हा सण शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा सण आहे. महाशिवरात्री उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची तीन अंगे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त रहावे, शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या असे विधान आहे, याला शिवरात्री पूजा म्हटले जाते. प्रत्येक पूजेत देवाला अभ्यंगस्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्त्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले, रुद्राक्षांच्या माळा, शाळुंका शिवपिंडीवर वाहाव्यात तसेच तांदुळाच्या पिठाचे सव्वीस दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळनी घालतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)