Mahashivratri 2024 : यंदा किती तारखेला साजरी होणार महाशिवरात्री? मुहूर्त आणि पूजा विधी

महाशिवरात्री (Mahashivratri 2024), भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा सण संपूर्ण भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यासाठी शिवमंदिरांमध्ये जय्यत तयारी केली जाते. अनेकांच्या घरी रुद्राभिषेक आणि शिव उपासना केली जाते. शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी असते.

Mahashivratri 2024 : यंदा किती तारखेला साजरी होणार महाशिवरात्री? मुहूर्त आणि पूजा विधी
महाशिवरात्रीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 03, 2024 | 11:15 AM

मुंबई : महाशिवरात्री (Mahashivratri 2024), भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा सण संपूर्ण भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यासाठी शिवमंदिरांमध्ये जय्यत तयारी केली जाते. अनेकांच्या घरी रुद्राभिषेक आणि शिव उपासना केली जाते. शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी असते. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री उत्सव साजरा केला जातो. असे मानले जाते की पार्वतीने भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती आणि या दिवशी त्यांची तपश्चर्या सफल झाली आणि भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला. तथापि, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला मासिक शिवरात्रीचे व्रत देखील पाळले जाते आणि विशेष पूजा केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनात अपार सुख आणि समृद्धी प्राप्त होते.

महाशिवरात्री कधी असते?

पंचांगानुसार, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी 8 मार्चला रात्री 9.57 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 मार्चला संध्याकाळी 6.17 वाजता समाप्त होईल. प्रदोष काळातच भगवान शिवाच्या उपासनेला विशेष महत्त्व असल्याने महाशिवरात्री हा उत्सव 8 मार्च रोजीच साजरा केला जाईल.

महाशिवरात्रीची पूजा पद्धत

महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल टाकावे. त्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीला नमस्कार करून व्रत आणि पूजा करण्याचा संकल्प करावा. त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. शिवमंदिरात जाऊन शिवाचा अभिषेक करावा किंवा घरी रुद्राभिषेक करावा.

हे सुद्धा वाचा

यासाठी शुभ मुहूर्तावर एका चौरंगावर लाल कापड पसरवावे. त्यानंतर माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करा. भगवान शिवाला कच्चे दूध किंवा गंगाजलाने अभिषेक करा. यानंतर पंचोपचार करा आणि विधीनुसार भगवान शिव आणि माता पार्वतीला अभिषेक करा. पूजेच्या वेळी भगवान शंकराला भांग, धतुरा, फळे, मदार, बेलची पाने इत्यादी अर्पण करा. पार्वतीला श्रृंगार अर्पण करा. यानंतर शिव चालीसा किंवा शिवस्तोत्राचे पठण करा. भगवान शिवाच्या मंत्रांचा जप करा. दुसऱ्या दिवशी, सामान्य पूजा करून उपवास सोडा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.