महाशिवरात्री | मुलगा आकाश सोबत मुकेश अंबानी सोमनाथ मंदिरात, मंदिराला मोठी रक्कम दान

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या सोमनाथ मंदिरात प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी मुलगा आकाश अंबानीसह हजेरी लावली. शिवलिंगावर अभिषेक आणि प्रार्थना केली.

महाशिवरात्री | मुलगा आकाश सोबत मुकेश अंबानी सोमनाथ मंदिरात, मंदिराला मोठी रक्कम दान
महाशिवरात्री | सोमनाथ मंदिराला मोठं दान, आकाश अंबानी यांच्यासोबत मुकेश अंबानी सोमनाथ मंदिरातImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Feb 18, 2023 | 10:28 PM

मुंबई : देशभरात मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी केली जात आहे. या दिवशी महादेवांची पूजा केल्यानं इच्छित फळ मिळतं अशी धारणा आहे. यासाठी शिवमंदिरांबाहेर भाविकांची मोठी रिघ लागली आहे. महाशिवरात्रीनिमित्त रिलायंस इंडस्ट्रिचे एमडी मुकेश अंबानी आणि त्याचा मुलगा आकाश अंबानी यांनी गुजरातमधील सोमनाथ मंदिरात हजेरी लावली अंबानी परिवार भगवान शंकराचे भक्त आहेत. इतकंच नाही तर प्रत्येक हिंहू सण आणि उत्सव तितक्यात उत्साहाने साजरे करतात.यावेळी त्यांनी मंदिरात अभिषेक आणि प्रार्थना केली. दर्शनासह मुकेश अंबानी यांनी सोमनाथ मंदिर ट्रस्टला 1.51 कोटी रुपयांचं दान देखील दिलं.यावेळी सोमनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पीके लाहिरी आणि सेक्रेटरी योगेंद्रभाई देसाई यांनी त्यांचं स्वागत केलं.

देशातील 12 ज्योतिर्लिंग या ठिकाणी आहेत

सोमनाथ : गुजरातमधील प्रभास क्षेत्रात हे मंदिर आहे. शिवपुराणानुसार प्रजापती दक्षाने चंद्राला क्षयरोगाचा शाप दिला होता, तेव्हा या ठिकाणी भगवान शंकराची पूजा करून तपश्चर्या केल्याने चंद्राची शापातून मुक्तता झाली.

मल्लिकार्जुन :हे मंदिर आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठावरील श्रीशैल पर्वतावर आहे. या पर्वताला दक्षिणेतील कैलास असंही संबोधलं जातं.

महाकालेश्वर :ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशातालील उज्जैनच्या क्षिप्रा नदीच्या तटावर स्थित आहे.

ओंकारेश्वर : हे ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशातील नर्मदा नदी पात्रात आहे. या ठिकाणी ओंकारेश्वर आणि अमलेश्वर असे दोन लिंग आहेत. पण एकच लिंगाची दोन स्वरुपात पूजा केली जाते.

केदारनाथ : हे ज्योतिर्लिंग उत्तराखंडच्या हिमालयातील केदार नावाच्या पर्वतावर आहे.

भीमाशंकर : हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील भीमा नदीच्या तीरावर असलेल्या सह्याद्री पर्वतात आहे. शिवपुराणातील एका कथेनुसारी भीमाशंकर ज्योतिर्लिंग आसामच्या कामरुप जिल्ह्यातील गुवाहाटीजवळील ब्रह्मपूर पर्वतात असल्याचं देखील सांगितलं जातं.

काशी विश्वनाथ : उत्तर भारतातील या शिवलिंगाला सर्वाधिक पूज्यनीय मानलं जातं. हे ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेशातील वारणासीमधील काशीत विराजमान आहे.

त्र्यंबकेश्वर : महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरीतील गोदावरी नदीकिनारी आहे. या स्थानाला पवित्र नदी गोदावरीचं उगम स्थानही मानलं जातं.

वैद्यनाथ : स्वंयभू ज्योतिर्लिंग झारखंडमधील देवघर येथील परळी गावाजवळ आहे. या ठिकाणी भगवान शिव वैद्यनाथाच्या रुपात प्रकट झाले होते.

नागेश्वर : ज्योतिर्लिंग गुजरातच्या द्वारकेत आहे. काही लोकांच्या मते हैदराबादमधील औंझा गावातील शिवलिंग हे नागेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून मानलं जातं.

रामेश्वर : ज्योतिर्लिंग तामिळनाडुतील रामनाड जिल्ह्यात स्थित आहे. रामायण आणि अन्य पौराणिक कथेनुसार भगवान रामांनी लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी शिवाची पूजा केली होती. त्यामुळे या शिवलिंगाचं नाव रामेश्वर असं पडलं आहे.

घृष्णेश्वर : ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील एलोरा गुंफेजवळ आहे. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाला घुसृणेश्वर असं संबोधलं जातं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.