Makar Sankranti 2023: मकर संक्रांतीला हे एक काम केल्याने मिळेल भाग्याची साथ, कधीच जाणवणार नाही पैशांची कमतरता!
मकर संक्रांतीच्या दिवशी काही विशेष गोष्टींचे दान केल्याने सौभाग्य प्राप्त होते असे म्हटले जाते. तसेच काही उपाय केल्याने भाग्याची साथ मिळते आणि आर्थिक समस्या दुर होतात.
मुंबई, मकर संक्रांती (Makar Sankranti 2023) हा ग्रहांचा राजा सूर्याला समर्पित केलेला सण आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान सदैव फलदायी असते. या दिवशी सकाळी स्नान करून सूर्याला जल अर्पण करून त्यांची पूजा केली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी काही विशेष गोष्टींचे दान केल्याने सौभाग्य प्राप्त होते असे म्हटले जाते. तसेच काही उपाय केल्याने भाग्याची साथ मिळते आणि आर्थिक समस्या दुर होतात.
मकर संक्रांतीच्या दिवशी हे उपाय नक्की करा
तिळाचे दान –
मकर संक्रांतीच्या निमित्ताने प्रत्येक व्यक्तीने स्नानानंतर तिळाचे दान करावे. शक्य असल्यास या दिवशी काळ्या तीळाचे दान करावे. जर काळे तीळ नसेल तर फक्त पांढरा तीळ दान करा. असे केल्याने सूर्यदेवाच्या कृपेने धन-धान्य वाढते आणि शनिदोषही दूर होतो.
गुळाचे दान –
मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गुळाचे दान करू शकता. या एका दानाने तुमच्या सूर्य, गुरु आणि शनि या तीन ग्रहांचे दोष दूर होतात. गूळ गुरू ग्रहाशी संबंधित मानला जातो. सूर्याला बल देण्यासाठीही गुळाचे दान केले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी गूळ आणि काळ्या तीळापासून बनवलेले लाडू दान केले जातात.
ब्लँकेट दान-
मकर संक्रांतीच्या दिवशी पूजेनंतर गरीबांना त्यांच्या क्षमतेनुसार ब्लँकेट आणि उबदार कपडे दान करावेत. असे केल्यास तुमच्या कुंडलीतील राहूशी संबंधित दोष दूर होतील आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील.
खिचडी-
मकर संक्रांतीच्या दिवशी काळे उडीद, हिरवे मूग आणि तांदूळ यापासून बनवलेल्या खिचडीचे दान केल्यास शनि, गुरु आणि बुध यांच्याशी संबंधित दोष दूर होतात. काळ्या उडीदचा संबंध शनिशी आणि हिरवा मूग बुध ग्रहाशी संबंधित आहे. खिचडीमध्ये तुम्ही हळद वापरता, जी गुरु ग्रहाशी संबंधित आहे. या सर्व ग्रहांचे दोष दूर झाल्यामुळे तुमचे भाग्य बलवान होते. कामात यश मिळण्याची शक्यता वाढते.
तांदळाचे दान-
मकर संक्रांतीच्या दिवशी तांदूळ दान केल्यास तांदूळ हे चंद्राचे प्रतीक आहे. यामुळे चंद्र बलवान होतो आणि जीवनात सुख-समृद्धी वाढते. तांदूळ दान केल्याने चंद्र दोषही दूर होतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)