Makar sankranti 2024 : यंदा किती तारखेला साजरी होणार मकर संक्रांत? तारखेचा संभ्रम करा दूर
Makar Sankranti 2024 हिंदू धर्मग्रंथानुसार सूर्यदेव उत्तरायण मकर संक्रांतीच्या दिवशी येते. सनातन धर्मात सूर्याच्या उत्तरायणाचे विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी भाविक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. यासोबतच या दिवशी पूजा, दान आणि जपाचेही खूप महत्त्व आहे.
मुंबई : दरवर्षी पौष महिन्यात सूर्य देव मकर राशीत (Makar Sankaranti 2024 Date) प्रवेश करतात तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते. हा दिवस सूर्यदेवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार सूर्यदेव उत्तरायण मकर संक्रांतीच्या दिवशी येते. सनातन धर्मात सूर्याच्या उत्तरायणाचे विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी भाविक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. यासोबतच या दिवशी पूजा, दान आणि जपाचेही खूप महत्त्व आहे. या दिवशी मोक्षप्राप्तीसाठी वाहत्या पाण्यात पितरांना तिलांजली अर्पण केली जाते. यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो. पण 2024 मध्ये मकर संक्रांतीच्या तारखेबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे. चला, आज आपण जाणून घेऊया मकर संक्रांत कधी आहे, शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धतीवर देखील एक नजर टाकूया.
सूर्याचे राशी परिवर्तन
ज्योतिषशास्त्रानुसार, सोमवार, 15 जानेवारी रोजी दुपारी 2:43 वाजता सूर्य देव धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करेल. त्यानंतर ज्या दिवशी सूर्य देव मकर राशीत प्रवेश करेल त्या दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाईल. हिंदू कॅलेंडरनुसार, यावेळी मकर संक्रांती सोमवार, 15 जानेवारी 2024 रोजी साजरी होणार आहे.
मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त
15 जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी 7.15 ते सायंकाळी 5.46 पर्यंत शुभ मुहूर्त आहे. या काळात पूजा, जप, तपश्चर्या आणि दान करावे. याने तुम्हाला शुभ परिणाम मिळतात. तर महा पुण्य काल सकाळी 7.15 ते सकाळी 9. या काळात पूजा आणि दान केल्यास सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते.
मकर संक्रांतीची पूजा पद्धत
येत्या सोमवारी 15 जानेवारी रोजी संपूर्ण भारतात मकर संक्रांतीचा सण साजरा होत आहे. या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम घराची स्वच्छता करावी. त्यानंतर पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे. शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करावे. यानंतर आचमन करून स्वतःची शुद्धी करा. त्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे. यासोबतच आपल्या ओंजळीत तीळ घेऊन ते वाहत्या प्रवाहात तरंगवावे. त्यानंतर तुम्ही पूर्ण विधीपूर्वक सूर्यदेवाची पूजा करा. पूजेच्या वेळी सूर्य चालिसाचे पठण करावे. शेवटी आरती करून नैवेद्य अर्पण करावे. त्यानंतर जीवनात सुख, शांती आणि ऐश्वर्य मिळावे यासाठी सूर्यदेवाची प्रार्थना करा. पूजा झाल्यावर दान करावे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)