उद्यापासून मंगल कार्याला होणार सुरूवात, असे आहेत आगामी मुहूर्त
यावर्षी खरमास 15 एप्रिललाच संपले होते. पण, गुरू आणि शुक्राच्या उदयानंतरच विवाहाचा शुभ योग तयार होतो. म्हणजेच 01 मे 2023 पासून शुभ कार्ये सुरू होतील.
मुंबई : हिंदू धर्मात विवाह बंधनाला अत्यंत पवित्र मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार शुभ मुहूर्तावर विवाह, गृह प्रवेश (Vastu Muhurat 2023) इत्यादी शुभ कार्य केल्याने शुभ फळ मिळते आणि तुमचे कार्यही विना अडथळा पूर्ण होते. शुभ मुहूर्तावर विवाह कार्य केल्याने वैवाहिक जीवनही सुखी होते. परंतु असे मानले जाते की खरमास दरम्यान लग्न, गृह प्रवेश करणे, मुंडण करणे इत्यादी कोणतेही शुभ कार्य करू नये. असे केल्याने वाईट परिणाम प्राप्त होतात. खरमास संपल्यानंतर शुभ किंवा मंगल कार्य सुरू होतात असे मानले जाते. यावर्षी खरमास 15 एप्रिललाच संपले होते. पण, गुरू आणि शुक्राच्या उदयानंतरच विवाहाचा शुभ योग तयार होतो. म्हणजेच 01 मे 2023 पासून शुभ कार्ये सुरू होतील. अशा परिस्थितीत येत्या काही महिन्यांत लग्न आणि इतर शुभ कार्यासाठी अनेक तारखा आहेत. या तारखांबद्दल जाणून घेऊया.
लग्नासाठी शुभ तारखा
मे – 1, 3, 7, 11, 12, 17, 21, 22, 26, 29,
जून– 5, 7, 8, 9, 12, 14, 18, 22, 23, 25, 28
नोव्हेंबर – 23, 24, 27, 28, 29
डिसेंबर – 5, 6, 7, 8, 9, 11, 15
जून महिन्यात विवाह होणार नाहीत
हिंदू धर्मीय मान्यतेनुसार देवशयनी एकादशीपासून विवाह आणि शुभ कार्ये थांबतात. पंचांगानुसार देवशयनी एकादशी या वर्षी 29 जून रोजी येणार आहे. असे मानले जाते की या दिवसापासून श्री हरी योग निद्रेत जातात. त्यानंतर कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. देवोत्थान एकादशीच्या दिवशी देव झोपेतून जागे होतात, अशी धार्मिक मान्यता आहे. यावेळी ही तारीख 23 नोव्हेंबर 2023 रोजी येत आहे. या तिथीपासून शुभ कार्य सुरू होतात.
गृह प्रवेशाचे शुभ मुहूर्त
ज्योतिष तज्ञ आणि घरासाठी वास्तुशास्त्रानुसार, ज्या दिवशी सकारात्मक ऊर्जा सर्वात मजबूत असेल त्या दिवशी तुम्ही नवीन घरात जावे. अशा प्रकारे, 2023 मध्ये गृहप्रवेश मुहूर्त तारीख ठरवण्यासाठी अनुकूल तारीख, नक्षत्र आणि तिथी शोधणे महत्त्वाचे आहे. 2023 मधील शुभ गृहप्रवेश मुहूर्त तारीख आणि वेळ खाली नमूद केली आहे; तथापि, जर तुम्हाला गृहप्रवेश समारंभ वेगळ्या तारखेला करायचा असेल, तर तुम्ही गृह प्रवेशापूर्वी ज्योतिषी किंवा पुजारी यांचा सल्ला घ्यावा.
मे- 6, 7, 15, 16, 20, 21, 22, 29, 30, 31
जून- 8, 10, 12, 13, 14
नोव्हेंबर- 17, 18, 22, 23, 27, 28, 29
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही)