मुंबई : धार्मिक मान्यतेनुसार, मंगळवार (Mangalwar Upay) हा भगवान हनुमानाला समर्पित आहे आणि या दिवशी त्यांची विधीपूर्वक पूजा केली जाते. मंगळवारी केलेल्या पुजेने अनेक लाभ मिळतात. असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही संकटाचा सामना करावा लागत असेल तर मंगळवारी रामभक्त हनुमानाची पूजा (Hanuman Puja) अवश्य करावी. यामुळे साधकाच्या आयुष्यात येणारे सर्व संकट दूर होतात. याशिवाय मंगळवारी केलेले काही उपाय तुमच्या जीवनात सुख, शांती आणि ऐश्वर्य येण्याचा मार्ग खुला करतात. या उपायांबद्दल जाणून घेऊया.
ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगल दोष असेल तर त्याला लाख प्रयत्न करूनही यश मिळत नाही. अशा परिस्थितीत मंगळवारी अवलंबलेला हा उपाय खूप प्रभावी ठरतो. मंगळवारी एक नारळ घेऊन लाल रंगाच्या कपड्यात बांधून हनुमान मंदिरात अर्पण करा किंवा वाहत्या नदीत अर्पण करा. हा उपाय 7 मंगळवारपर्यंत करा. यामुळे तुमच्या पत्रिकेत मंगळ बलवान होईल.
घरात सुख, शांती आणि समृद्धी मिळवायची असेल, जीवनात प्रगती करायची असेल तर मंगळवारी हनुमानजींच्या मंदिरात जाऊन त्यांची पूजा करावी आणि त्यांना गूळ, हरभरा आणि मुग अर्पण करावी. यानंतर माकडांना गूळ आणि हरभरा खाऊ घालणे देखील शुभ आहे. हे 21 मंगळवारपर्यंत करावे. यामुळे तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होईल.
मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि लक्षात ठेवा दिव्यामध्ये फक्त लाल रंगाची वात वापरावी. लाल वात नसेल तर थोडे कुंकू लावा. यानंतर मंदिरात बसून बजरंगबाण आणि हनुमान चालीसा पठण करा. याने सुख-समृद्धी आणि संपत्तीचा योग तयार होतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)