Mangalwar Upay : मंगळवारी करा हनुमानजींशी संबंधीत हे सोपे उपाय, सर्व मनोकामना होतील पुर्ण
मंगळवारचा दिवस हा रामभक्त हनुमान यांना समर्पित आहे. या दिवशी व्रत आणि काही उपाय (Mangalwar Upay) केल्याने हनुमानजी प्रसन्न होतात आणि आशिर्वाद देतात असे म्हटले जाते.

मुंबई, हिंदू धर्मात प्रत्येक वार हा कोणत्या ना कोणत्या देवासाठी विशेष पूजनीय मानला जातो. या दिवशी केलेल्या काही उपायांमुळे जीवनातील दुःख आणि शारीरिक कष्ट दूर होतात असे मानले जाते. मंगळवारचे काही उपाय ज्योतिषशास्त्रात (Tuesday Remedy) सांगितले आहेत. मंगळवारचा दिवस हा रामभक्त हनुमान यांना समर्पित आहे. या दिवशी व्रत आणि काही उपाय (Mangalwar Upay) केल्याने हनुमानजी प्रसन्न होतात आणि आशिर्वाद देतात असे म्हटले जाते. कलयुगात हनुमानजी चिरंजीवी असून त्यांच्या कृपेने व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. जाणून घेऊया मंगळवारी कोणते उपाय करावे याविषयी.
मंगळवारच्या दिवशी अमलात आणा हे सोपे उपाय :
- मंगळवारी सकाळी स्नान केल्यानंतर कोणत्याही हनुमान मंदिरात जावे. तेथे हनुमानजींना दिवा, फूल, हार आणि लाडू-पान अर्पण करा. त्यानंतर तिथे बसून 108 वेळा हनुमान चालिसाचा पाठ करा. यानंतर तुमचे संकट दूर करण्यासाठी बजरंग बलीला प्रार्थना करा. हा उपाय दर मंगळवारी आणि शनिवारी करावा. हा उपाय केल्यावर कुंडलीतील सर्व ग्रह शुभ फळ देऊ लागतात.
- मंगळवारी, सकाळी किंवा दुपारी अशा ठिकाणी जा जेथे माकडे खूप आहेत. त्यांना गूळ, केळी, हरभरा, शेंगदाणे इत्यादी खाद्यपदार्थ द्या. शक्य असल्यास गरीबाला अन्न द्या. यानंतर तुम्ही तुमचे काम सुरू करा. लवकरच पैसे तुमच्याकडे येऊ लागतील. लक्षात ठेवा हा उपाय सूर्यास्तानंतर करू नये. गरीबाला केव्हाही अन्न दान केले जाऊ शकते, परंतु त्याला अन्नासाठी पैसे देऊ नका, तर फक्त त्याला खायला द्या.
- कुंडलीत शनीची महादशा चालू असेल किंवा शुभ ग्रहांवर शनीच्या दृष्टीमुळे अशुभ प्रभाव पडत असेल तर मंगळवारी 108 तुळशीच्या पानांवर पिवळ्या चंदनाने रामाचे नाव लिहावे. त्यानंतर या पानांची माळ बनवून हनुमानजींना वाहावी. यामुळे शनि, मंगळ आणि राहूशी संबंधित सर्व दोष लगेच दूर होतात. जो हा उपाय करतो त्याला कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)