Mangalwar Upay : मंगळवारच्या दिवशी केलेले हे चार उपाय करतील चार मोठ्या समस्यांतून सुटका
धर्म आणि ज्योतिष्यानुसार मंगळवार हनुमानाचा अत्यंत प्रिय दिवस आहे. म्हणून या दिवशी मनापासून हनुमानाची पूजा केल्याने विशेष फळ प्राप्ती होते. यासोबतच मंगळ ग्रहाचे अशुभ प्रभाव कमी होतात.
मुंबई : हिंदू धर्मात मंगळवार (Mangalwar Upay) हा हनुमानजींना समर्पित आहे. या दिवशी विधीपूर्वक हनुमानजीची पूजा केल्याने ते लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात. असे म्हणतात की, हनुमानजी प्रसन्न झाले तर माणसाच्या जीवनात येणाऱ्या सर्व समस्या दूर होतात. जर एखाद्या व्यक्तीला नोकरीची चिंता असेल किंवा पैसे मिळण्याबाबत समस्या येत असतील तर मंगळवारी केलेले हे उपाय त्या व्यक्तीला या समस्येतून बाहेर काढते. मंगळवारी करावयाच्या या उपायांबद्दल जाणून घेऊया.
मंगळवारी करा हे चार उपाय
- जर तुम्हाला नोकरीची चिंता असेल, नोकरी मिळत नसेल किंवा वारंवार अपयशाचा सामना करावा लागत असेल तर निराश होण्याची अजिबात गरज नाही. मंगळवारी हनुमानाची पूजा करा. या दिवशी हनुमानजींच्या मंदिरात जाऊन त्यांच्यासमोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा. यासोबत तिथे बसून हनुमान चालीसा पाठ करा. हा उपाय केल्याने व्यक्तीचा रोजगाराचा मार्ग खुला होतो.
- घरात सुख-समृद्धी मिळवण्यासाठी, कलह आणि वाद दुर करण्यासाठी मंगळवार आणि शनिवारी हनुमान मंदिरात बजरंगबलीची पूजा करा. 21 मंगळवारी त्यांना गूळ आणि हरभरा अर्पण करा. 21 मंगळवारी हनुमानजींना चोळा अर्पण करा. हा उपाय नियमित आणि भक्तीभावाने केल्यास घरात सुख-समृद्धी येऊ लागते.
- काम किंवा वैयक्तिक जीवनात शत्रूंमुळे त्रासलेल्या लोकांनी मंगळवारी सकाळी स्नानानंतर हनुमान मंदिरात जावे. पूर्ण भक्तिभावाने बजरंगबानचे पठण करावे. 21 मंगळवारपर्यंत हा उपाय केल्यास जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतील.
- काही गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी मंगळवारी भांड्यात पाणी घेऊन हनुमानजींच्या प्रतिमेसमोर ठेवावे. यानंतर तिथे बसून हनुमान बाहुकचा पाठ करा. पाठ पूर्ण झाल्यावर हे पाणी घ्या. यानंतर दुसरे पाणी भरून ठेवावे. असे सतत 21 मंगळवार केल्याने माणसाला त्रासदायक आजारांपासून मुक्ती मिळते.
हे सुद्धा वाचा
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)