Mangalwar Upay: मंगळवारी केलेल्या ‘या’ उपायांमुळे दूर होईल सर्व संकट, बजरंगबलीची राहील कृपा
मंगळवार हा भगवान हनुमान यांना समर्पित असलेला वार आहे. या दिवशी केलेल्या काही उपायांमुळे कार्यसिद्धी होते, असेच संकटं दूर होतात.
मुंबई, हिंदू धर्मात प्रत्येक वार हा कोणत्या ना कोणत्या देवासाठी विशेष पूजनीय मानला जातो. या दिवशी केलेल्या काही उपायांमुळे जीवनातील दुःख आणि शारीरिक कष्ट दूर होतात असे मानले जाते. मंगळवारचे काही उपाय ज्योतिषशास्त्रात (Tuesday Remedy) सांगितले आहेत. मंगळवारचा दिवस हा रामभक्त हनुमान यांना समर्पित आहे. या दिवशी व्रत आणि काही उपाय (Mangalwar Upay) केल्याने हनुमानजी प्रसन्न होतात आणि आशिर्वाद देतात असे म्हटले जाते. कलयुगात हनुमानजी चिरंजीवी असून त्यांच्या कृपेने व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. जाणून घेऊया मंगळवारी कोणते उपाय करावे याविषयी.
- मंगळवारी हनुमानजींची सकाळी आणि सायंकाळी पूजा करणे फलदायी मानली जाते. सूर्यास्तानंतर पूजेचा विशेष मुहूर्त असतो. या दिवशीय विधिपूर्वक हनुमानजींची पूजा केल्यास शुभ परिणाम मिलतात.
- भगवान हनुमान यांना लवकर प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी मंदिरात जाऊन ‘राम नाम’चा जप करावा. बजरंगबली यांना प्रभू श्रीरामाचे परम भक्त आहेत. त्यामुळे ‘राम नाम’चा जप अवश्य करावा.
- मंगळवारच्या दिवशी हनुमान मंदिरात गुळ आणि हरभऱ्याच्या प्रसाद ठेवावा. असे केल्याने जीवात सुख-शांती आणि समृद्धी येते.
- जी व्यक्ती शारीरिक समस्येमुळे त्रस्त आहे त्यांनी मंगळवारी एका भांड्यात पाणी भरून हनुमानजींच्या प्रतिमेसमोर ठेवावे. असे केल्याने शुभ लाभ मिळतात.
- शक्य असल्यास मंगळवारी उपवास करून गरिबांना अन्न दान करावे. हा उपाय केल्याने धन आणि अन्नाची कमी भासत नाही.
- बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी भगवा चोला चढवावा. तसेच सुंदर कांडचे पठण करावे. यामुळे बजरंगबलीची कृपा लाभते.
- मंगळवारी हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी राम रक्षा स्तोत्रचे पठन करावे.
- नोकरीच्या शोधात असलेल्यांनी मंगळवारी पानाचा विडा हनुमानजीला अर्पण करावा. यामुळे नोकरी मिळवताना येत असलेले अडथळे दूर होतील.
- तुम्हाला आर्थिक चणचण जाणवत असेल तर मंगळवारी बजरंगबलीला केवड्याचे अत्तर आणि गुलाबाच्या फुलांचा हार घाला.
- मंगळवारी हनुमानजीच्या मूर्ती किंवा प्रतिमेसमोर बसून प्रभू श्रीरामाच्या कोणत्याही एका मंत्राचा जप करावा.
हे सुद्धा वाचा
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)