Mantra Jaap Rules : मंत्राचा जाप 108 वेळा का करावा? असे आहे या मागचे कारण

शास्त्रज्ञांच्या मते, जपमाळाच्या 108 मणी आणि सूर्याच्या कला यांच्यात खोल संबंध आहे. सूर्य एका वर्षात 216000 कला बदलतो आणि वर्षातून दोनदा आपली स्थिती देखील बदलतो.

Mantra Jaap Rules : मंत्राचा जाप 108 वेळा का करावा? असे आहे या मागचे कारण
मंत्र जापImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 03, 2023 | 10:04 PM

मुंबई : हिंदू पौराणिक कथेनुसार, मंत्रोच्चारासाठी आपण वापरत असलेल्या जपमाळातील मण्यांची संख्या 108 असते. शास्त्रात 108 क्रमांकाला खूप महत्त्व आहे. यामागे अनेक धार्मिक, ज्योतिषशास्त्रीय आणि वैज्ञानिक मान्यता आहेत, जपमाळेत फक्त 108 मणी का असतात? मंत्रजपासाठी माळ का वापरावी? या मागचे नेमके कारण अनेकांना नाही माहिती. हिंदू धर्मग्रंथानुसार रुद्राक्षाची जपमाळ (Mantra Jaap Rules) मंत्रोच्चारासाठी उत्तम आहे. रुद्राक्ष हे महादेवाचे प्रतीक मानले जाते. रुद्राक्षमध्ये सूक्ष्म जंतूंचा नाश करण्याची शक्ती देखील आहे आणि रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा शोषून घेतो तसेच साधकाच्या शरीरात उर्जा निर्माण करतो. रुद्राक्षा व्यतिरिक्त ही माळा तुळशी, स्फटिक, मोती किंवा रत्नांची देखील बनविली जाते. प्राचीन काळापासून महान तपस्वी, ऋषी-मुनी या उपायाचा अवलंब करत आले आहेत.

महत्त्वाची माहिती आणि नियम

देवपूजेसाठी कुबेर मुद्रा अत्यंत महत्त्वाची आहे, त्यानंतर दान आवश्यक आहे. मंत्राचा जप करताना माळ अवश्य वापरावीत. जपमाळेशिवाय मंत्राच्या जपाचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही. जो कोणी जपमाळाच्या साहाय्याने मंत्राचा जप करतो त्याच्या मनोकामना लवकर पूर्ण होतात. जर मंत्रजप निश्चित क्रमांक 108 नुसार केला तर उत्तम आहे.

शास्त्रानुसार, जपमाळाच्या 108 मण्यांची संख्या संपूर्ण निरोगी व्यक्ती दिवसात किती वेळा श्वास घेते याच्या संख्येशी संबंधित आहे. साधारणपणे 24 तासात एक व्यक्ती 21600 वेळा श्वास घेते. दिवसाच्या 24 तासांपैकी 12 तास दैनंदिन कामात घालवले जातात आणि उरलेल्या 12 तासात माणूस 10800 वेळा श्वास घेतो. शास्त्रानुसार, व्यक्तीने प्रत्येक श्वासात 10800 वेळा म्हणजेच पूजेसाठी निर्धारित वेळेत 12 तास देवाचे ध्यान केले पाहिजे, परंतु हे शक्य नाही. म्हणूनच 10800 श्वासांच्या संख्येतून शेवटची दोन शून्ये काढून नामजपासाठी 108 संख्या निश्चित करण्यात आली आहे. या संख्येच्या आधारे नामजपाच्या जपमाळात 108 मणी आहेत.

हे सुद्धा वाचा

वैज्ञानिक महत्त्व

शास्त्रज्ञांच्या मते, जपमाळाच्या 108 मणी आणि सूर्याच्या कला यांच्यात खोल संबंध आहे. सूर्य एका वर्षात 216000 कला बदलतो आणि वर्षातून दोनदा आपली स्थिती देखील बदलतो. उत्तरायण सहा महिने आणि दक्षिणायन सहा महिने असते. म्हणून, सूर्य सहा महिन्यांच्या कालावधीत 108,000 वेळा त्याच्या कला बदलतो. या क्रमांकातले 108000 मधील शेवटचे तीन शून्य काढून 108 मण्यांची माळ निश्चित केली आहे. माळाचा प्रत्येक मणी सूर्याच्या प्रत्येक कलेचे प्रतीक आहे. सूर्यच माणसाला तेजस्वी बनवतो, सूर्य ही एकमेव दृश्य देवता आहे, म्हणूनच सूर्याच्या कलांच्या आधारे दानांची संख्या 108 निश्चित करण्यात आली आहे.

जपमाळातील 108 मण्यांची संख्या संपूर्ण विश्वाचे प्रतिनिधित्व करते. ज्योतिषशास्त्रानुसार, संपूर्ण ब्रह्मांड 12 भागांमध्ये (राशी) विभागले गेले आहे. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन अशी या 12 राशींची नावे आहेत. सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतू हे नऊ ग्रह या 12 राशींमध्ये फिरतात. म्हणून, जर 12 राशीच्या संख्येत ग्रहांची संख्या 9 ने गुणाकार केली तर संख्या 108 होईल. ज्योतिषशास्त्रानुसार या संख्येच्या आधारे जपमाळात 108 मणी असतात.

हे अवश्य करा

दुसर्‍या मान्यतेनुसार 108 मणी माळा ठेवण्यामागे ऋषीमुनींनी ज्योतिषशास्त्रीय कारणे सांगितली आहेत. शास्त्रानुसार एकूण 27 नक्षत्रे सांगितली आहेत. प्रत्येक नक्षत्रात 4 चरण असतात आणि एकूण 27 नक्षत्रांचे चरण 108 असतात. मालेचा प्रत्येक दाणा नक्षत्राच्या प्रत्येक टप्प्याचे प्रतिनिधित्व करतो.

मंत्रोच्चाराच्या माळेच्या वरच्या बाजूला एक मोठा दाणा असतो ज्याला सुमेरू म्हणतात. नामजपाची संख्या सुमेरूपासून सुरू होते आणि इथेच संपते. नामस्मरणाचे एक चक्र सुमेरू दाण्यापर्यंत पोहोचले की जपमाळ उलटे होते. सुमेरू कधीही पार करू नये. जेव्हा तुम्ही मंत्र जप पूर्ण कराल तेव्हा कपाळावर सुमेरू लावून नमस्कार करावा. यामुळे नामजपाचे पूर्ण फळ मिळते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.