Shrawan Somwar 2023 : या तारखेपासून सुरू होणार श्रावण महिना, पहिला श्रावण सोमवार किती तारखेला आहे?
यंदाचा श्रावण महिना अधीक मासामुळे विशेष असणार आहे. यावर्षी श्रावण महिना किती तारखेला सूरू होणार आणि श्रावण सोमवार किती तारखेला येणार याची संपूर्ण यादी जाणून घ्या.
मुंबई : हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू योग निद्रेत जातात आणि सृष्टीचा सर्व कारभार भगवान शंकराकडे सोपवतात. या चार महिण्याच्या कालावधीत भगवान शंकराच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. विशेषतः श्रावण महिण्यात महादेवाची उपासना केल्यास भगवंताची विशेष कृपा लाभते. श्रावण महिन्यातले सोमवार (Shrawan Somwar 2023) हे अत्यंत पवित्र मानल्या जातात. या दिवशी शिव भक्त महादेवाची विशेष साधना करतात. या काळात केलेली उपासना विशेष फलदायी असते अशी फलदायी असते अशी धार्मिक मान्यता आहे. यंदा श्रावण महिना किती तारखेपासून सुरू होणार आहे आणि किती तारखेला कोणता श्रावण महिना असणार आहे ते जाणून घेऊया.
श्रावण सोमवार तारीख
यावेळी श्रावण महिना सुमारे 2 महिन्यांचा असणार आहे. श्रावण महिना 18 जुलै 2023 पासून सुरू होईल आणि 15 सप्टेंबर पर्यंत चालेल. म्हणजेच यावेळी एकूण 59 दिवस भाविकांना भगवान शंकराची आराधना करण्याची संधी मिळणार आहे. यंदा अधीक मास असल्याने श्रावण महिना दोन महिन्यांचा असेल.
- पहिला श्रावण सोमवार 24 जुलै
- दुसरा श्रावण सोमवार 31 जुलै
- तीसरा श्रावण सोमवार 07 ऑगस्ट
- चौथा श्रावण सोमवार 14 ऑगस्ट
- पाचवा श्रावण सोमवार 21 ऑगस्ट
- सहावा श्रावण सोमवार 27 ऑगस्ट
- सातवा श्रावण सोमवार 04 सप्टेंबर
- आठवा श्रावण सोमवार 11 सप्टेंबर
बेलाची पाने तोडतांना हे नियम अवश्य पाळा
चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि अमावस्या तिथीला बेलची पाने तोडू नयेत. तसेच संक्रांतीच्या काळात आणि सोमवारी बेलची पाने तोडू नयेत. यासाठी डहाळीसह बेलपत्रही तोडू नये. डहाळीहून निवडून केवळ बेलपत्र तोडले पाहिजे, कधीही पूर्ण डगाळ तोडू नये. पत्री तोडताना झाडाला हानी होता कामा नये. बेलपत्र तोडण्यापूर्वी आणि नंतर झाडाला मनात प्रणाम करावे. महादेवाला बेलपत्र नेहमी उलटं अर्पित करावं अर्थात पानाचा गुळगुळीत भाग शिवलिंगाच्या वरच्या भागाला असावा. बेलपत्रात चक्र आणि वज्र नसावे. बेलपत्र 3 ते 11 दल या प्रकारे असतात. जितके अधिक दल असतील तितकं उत्तम मानले जाते. बेलपत्र उपलब्ध नसल्यास बेलाच्या झाडाचे दर्शन मात्र पाप नष्ट करण्यासाठी पुरेसं आहे. शिवलिंगावर इतर कोणी अर्पित केलेल्या बेलपत्राची उपेक्षा किंवा अपमान करणे योग्य नाही.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)